अवकाळी पावसाचा फटका, आंबा, काजू धोक्यात

गोव्यातील आंबा आणि काजू बागायतदार वर्गामध्ये चिंतेचं वातावरण
loss to Cashew Plant due to untimely rain
loss to Cashew Plant due to untimely rainDainik Gomantak

पणजी : गोव्यात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. यासोबतच गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाचीही हजेरी गोव्याच्या विविध भागात पाहायला मिळाली. अवकाळी पावसामुळे काजू आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साहजिकच बागायतदार वर्ग चिंतेत पडला आहे. (Untimely Rain News Updates)

loss to Cashew Plant due to untimely rain
ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे यांचे निधन

गोव्यात (Goa) अवकाळी पावसाने वर्दी दिल्याने उन्हाळी पिकं धोक्यात आली आहे. काजू, आंबा, फणस आदी पिकांना मोहोर धरला असतानाच पाऊस आल्याने काही ठिकाणी मोहोर झडल्याचं चित्र आहे. आधीच लांबलेल्या पावसामुळे (Rain) झालेलं नुकसान त्यात अवकाळीची हजेरी यामुळे गोव्यातील बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, काजूच्या उत्पादनात घट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

loss to Cashew Plant due to untimely rain
पर्येत सासरे, सून आमने-सामने, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊनही...

गोव्यात हवामानात (Weather) बदल होत असतानाच थंडीचा कडाका वाढतानाच दिसत आहे. त्यातच पाऊस पडल्याने मोहोरानंतरची फळं धरण्याची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. साहजिकच आंबा आणि काजू हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. मात्र सतत पाऊस पडत नसल्याने हातचं पीक जाणार नसल्याचंही बागायतदारांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com