महाराष्ट्रातील पर्यटकांना ‘ते’ आमिष पडले जास्तच महाग!

पर्यटनासाठी आलेल्या चंदगड येथील युवकांना काय होते अपेक्षित?
Mapusa Loot of Tourist
Mapusa Loot of TouristDainik Gomantak

म्हापसा : चंदगडमधील युवक पर्यटकांना मारहाण करून त्यांची लुबाडणूक केल्याचे प्रकरण सध्या बरेच गाजत आहे. या पीडितांकडून बनवलेल्या एका कथित पाठमोऱ्या व्हिडिओमुळे सध्या गोवा राष्ट्रीय बातम्यांवर झळकत आहे. परिणामी राज्याच्या पर्यटनाची बरीच बदनामी झाल्याचे दिसते.

प्राप्त माहितीनुसार, सदर युवक हे गोव्यात पर्यटनासाठी 23 मे रोजी दाखल आले होते. तर दुसऱ्या दिवशी ते गावी परतत असताना, त्यांना दुपारच्या वेळी काही टाऊट्सनी म्हापशात गाठले. तुम्हाला स्वस्तमध्ये ‘मसाज सेवा’ पुरवू असे त्यांना सांगितले. यास हा ११ जणांचा युवक गट भुरळा व त्यांनी आपली गाडी या टाऊट्सने दाखविलेल्या ब्यूटी पार्लर मसाज सेंटरकडे वळविली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

या पिडिताच्या दाव्यानुसार, या टाऊट्सवाल्यांनी आम्हाला स्वस्तात जेवण पुरवतो असे सांगितले व त्यामुळे आम्ही त्याठिकाणी गेल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मुळात कुठली व्यक्ती स्वस्त जेवण देतो म्हणून एखाद्या पर्यटकांच्या मागे येतात? याशिवाय सदर इमारतीत प्रवेश करताना किंवा पार्लरमध्ये प्रवेश करतेवेळी कुणालाच सदर आस्थापन हे रेस्टॉरंट नसून तो एक ब्युटी पार्लर-मसाज सेंटर असल्याचे जाणवले नाही? हा प्रश्नही उपस्थित होतो.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या गटास कमी किंमतीत मसाज करून देतो असे सांगितले गेले होते. त्यामुळे या युवकाचा गट तिथे गेला. त्याठिकाणी काही वेळ डोक्याला मसाज दिल्यानंतर त्यांना एका दुसऱ्या खोलीत नेले आणि तिथे त्यांच्याजवळील मोबाईल व पैसे उकळले. शिवाय त्यातील काही युवकांचे मुलींच्या उपस्थितीत नग्न व्हिडिओ काढले गेले.

आणि तुम्ही बाहेरून येणारी मंडळी सेक्ससाठी कुठेही येऊ शकता, असे म्हणत संशयितांनी या गटाला शिवीगाळ करीत मारहाण केली आणि त्यांच्याकडून पैसेही काढून घेतले. तसेच या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास हे व्हिडिओ सोशल मीडियावर आम्ही व्हायरल करु, अशी धमकी दिली.

Mapusa Loot of Tourist
दक्षिण गोव्यात वर्षभरात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार

या प्रकारामुळे ते युवक घाबरले व त्यांनी तेथून काढता पाय घेतला. नंतर हा प्रकार या गटाने आपल्या गावी चंदगडला मित्रपरिवारांकडे कथन केला. तेथील एका सामाजिक कार्यकत्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने म्हापसा पोलिसांशी संपर्क साधला असता स्थानिक पोलिसांनी ही तपासचक्रे फिरली व हा प्रकार उघडकीस आला होता.

याप्रकरणी सुरवातीला म्हापसा पोलिसांनी सचिन भारद्वाज, आशिष जगीर सिंग व मुबारक अली मौला यांना अटक केली. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणात गुंतलेल्या इतर तिघा नेपाली मुलींना अटक केली. या संशयितांना न्यायालयाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com