Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Goa Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापले असतानाच निवडणुकीतील उमेदवारांचा आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना राजू नायक यांनी उपस्थित सहभागींना अनेक प्रश्‍न विचारले.
Goa Loksabha Election
Goa Loksabha ElectionDainik Gomantak

Goa Loksabha Election

उघडपणे कोणीच बोलत नसल्याने ‘सायलंट मतदार’च यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मतांचा करिष्मा दाखवतील, असा सूर फोंड्यात काल ‘गोमन्तक टीव्ही’ने जीव्हीएमच्या सभागृहात आयोजित महाचर्चेत काही मान्यवरांनी व्यक्त केला.

फोंडा तालुक्यासह राज्यातील राजकीय स्थिती, उमेदवारांचा प्रचार, सत्ताधाऱ्यांच्या विकासाचे विश्‍लेषण, विरोधकांची निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आणि मतदारांची मनस्थिती यावर सुरेख विवेचन केले. रंगतदार झालेल्या या चर्चासत्रात सहभागी मान्यवरांना ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी बोलते केले.

या चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील भास्कर खांडेपारकर, फादर व्हीक्टर फेर्रांव. उद्योग क्षेत्रातील संदीप खांडेपारकर व महेंद्र खांडेपारकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राम कुंकळकर, उद्योजक जयंत मिरिंगकर, व्यावसायिक प्रमोद सावंत, माजी प्राचार्य मिलिंद म्हाडगूत, काँग्रेसच्या कार्यकर्त्या मनिषा उसगावकर तसेच पत्रकार नरेंद्र तारी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापले असतानाच निवडणुकीतील उमेदवारांचा आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना राजू नायक यांनी उपस्थित सहभागींना अनेक प्रश्‍न विचारले.

यावेळी फादर व्हीक्टर फेर्रांव यांनी गोव्याच्या हितासाठी आज मतदारांनी विचार करण्याची पाळी आल्याचे सांगितले. भास्कर खांडेपारकर यांनी भाजपने शिक्षण क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्रात चांगले कार्य केले असल्याचे नमूद केले.

संदीप खांडेपारकर यांनी भाजपच्या काळात मूलभूत सुविधांबरोबरच लोकोपयोगी उपक्रम साकारले गेले, असे सांगितले. तर राम कुंकळ्येकर यांनी या सर्वांचे मुद्दे खोडून काढत केवळ निवडणूक डोळ्यांसमोर जाती धर्माच्या नावावर भाजपने फोडाफोडी केल्याचा आरोप केला.

काँग्रेस पक्षाच्या काळातही अशाप्रकारचा विकास झाला नव्हता, असे सांगत संदीप खांडेपारकर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वामुळेच गोव्याला भरभक्कम निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. मनिषा उसगावकर यांनी भाजपकडून द्वेषाचे राजकारण चालले असल्याचा आरोप करीत अनेक मुद्दे उपस्थित केले.

Goa Loksabha Election
Goa News : भाजप सरकार धूळफेक करणारे : अमित पाटकर

एकही उल्लेखनीय उद्योग आणला नाही!

गोव्यात भाजपकडून एकही उल्लेखनीय औद्योगिक प्रकल्प आणला गेला नाही, असे सांगून उद्योग क्षेत्रातील हे भाजपचे अपयश असल्याचे महेंद्र खांडेपारकर यांनी नमूद केले. मिलिंद म्हाडगूत यांनी मतदार आणि उमेदवार या दोघांमुळे आज मतदानासाठी देवघेवीचे प्रकार होत असल्याचा आरोप केला.

जयंत मिरिंगकर यांनी भाजपने राष्ट्रीयत्व जपले असल्याचे सांगितले तर नरेंद्र तारी यांनी विकासाबरोबरच व्यक्तीविकासही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. या चर्चासत्रात अनेक मुद्द्यांवर मोठी चर्चा झाली. काही विषयांवर तर वाद निर्माण होण्याचा प्रसंग उद्भवला, एकमेकांचे मुद्दे खोडून काढण्यात आले, शेवटी प्रकरण व्यवस्थितपणे निभावले. एकंदर एक सकस चर्चासत्र पहायला मिळाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com