Francisco Sardinha : लोकसभा पावसाळी अधिवेशनात 30 प्रश्र्न; खा. फ्रान्सिस सार्दिन यांची माहिती

गोव्याच्या हिताचे प्रश्र्न असून त्यात कोळसा, रेल्वे दुपदरीकरण, पणजी स्मार्ट सिटी, पश्र्चिम बगल रस्ता स्टिल्टवर, म्हादई नदी यांचा समावेश
MP Francisco Sardinha
MP Francisco SardinhaDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Monsoon Session 2023 : गुरुवार २१ जुलैपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात आपण वेगवेगळ्या विषयांवर ३० प्रश्र्नांची प्रश्नावली सादर केल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी सांगितले. अधिवेशनातील कामकाज सुरळीत होईल की नाही, याबद्दल आपण साशंक असल्याचेही सार्दिन यांनी सांगितले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेसंदर्भात विरोधी पक्ष सरकार धारेवर धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा अधिवेशनात आपण जी प्रश्नावली पाठवली आहे, त्यात बहुतेक गोव्याच्या हिताचे प्रश्र्न असून त्यात कोळसा, रेल्वे दुपदरीकरण, पणजी स्मार्ट सिटी, पश्र्चिम बगल रस्ता स्टिल्टवर, म्हादई नदी यांचा समावेश आहे.

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा पत्र लिहून गोव्यासंदर्भातील प्रश्र्नावर योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्याचेही सार्दिन यांनी सांगितले.

धनगर समाजाला एसटी दर्जा मिळवून देण्यास आपण प्राधान्य देणार आहे, असे सांगून सार्दिन म्हणाले, आपण केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांना या संदर्भात पत्र लिहिले होते. त्यांच्याशी चर्चाही केली होती.

MP Francisco Sardinha
Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूचे 35 बॉक्स आजऱ्यात जप्त; पुण्यातील कारचालकास अटक

आपल्या पत्रानुसार व चर्चेत जो संवाद झाला, त्याची आपण दखल घेतली आहे, असे पत्र केंद्रीयमंत्री मुंडे यांनी पाठविल्याचेही सार्दिन यांनी सांगितले.

जुन्या इमारतींची तपासणी करा

कला अकादमीसारख्या कला व संस्कृतीसंबंधात इमारतीचे छत कोसळणे ही गंभीर बाब आहे. बांधकाम चालू असताना छत कोसळणे, ही तर त्याहून जास्त गंभीर घटना आहे. तेव्हा हे छत कोसळण्यामागे ज्या तांत्रिक व्यक्ती जबाबदार आहेत, त्यांना दंड ठोठावावा, अशी मागणी खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी आज मडगावात पत्रकार परिषदेत केली.

MP Francisco Sardinha
Goa Forward गोवावासीयांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर अधिवेशनात आवाज उठवणार - विजय | Gomantak TV

गोव्यात ज्या जुन्या इमारती आहेत, सरकारी शाळा आहेत, त्याचे सर्वेक्षण व तपासणी होणे आवश्यक आहे. हे सरकार केवळ योजना व विकासकामे जाहीर करते.

शेतकऱ्यांना अजून अनुदान देण्यात आलेले नाही, ऊस शेतकऱ्यांचे आंदोलन, खराब झालेले रस्ते, बालरथ चालकांचा संप, ड्रग्स विक्रेत्यांचा सुळसुळाट हे सर्व प्रश्‍न सरकारने ताबडतोब सोडवावेत, असा सल्लाही सार्दिन यांनी या वेळी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com