Loksabha Election : उत्तरेतील खासदार ठरवणार पाच लाख ७७ हजार मतदार

Loksabha Election : जिल्हाधिकारी गीते ८६३ मतदान केंद्रामध्ये होणार मतदान
Loksabha Election
Loksabha Election Dainik Gomantak

Loksabha Election :

पणजी, राज्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी मे महिन्याच्या ७ तारखेला मतदान होणार आहे. उत्तर गोव्यातील ५ लाख ७७ हजार ७७ मतदार आपला पसंतीचा खासदार निवडणार आहेत.

जिल्ह्यातील ८६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या परिषदेस जिल्हा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रशासनाची सज्जतेविषयी माहिती देताना डॉ. गीते म्हणाल्या, केंद्रीय आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेलाच आहे.

त्यानुसार १२ ते १९ एप्रिल अर्ज सादरीकरण, त्यानंतर अर्ज मागे घेण्याची तारीख २२ एप्रिल, मतदान ७ मे रोजी आणि निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. उत्तर गोव्यात एकूण मतदान ५ लाख ७७ हजार ९७७ मतदार आहेत. त्यात २ लाख ८० हजार २६० पुरुष मतदार, तर २ लाख ९७ हजार ७१४ महिला मतदार आहेत.

तीन तृतीयपंथी आणि ४ हजार ९५५ दिव्यांग मतदार आहेत. उत्तरेतील २० विधानसभा मतदारसंघात ८६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. उन्हापासून लोकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर शेडची उभारणी, पाण्याची सोय, शौचालयाची सोय, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सोय असेल. २० मतदान केंद्रे गुलाबी रंगाची असतील, तर ५ मतदान केंद्रे दिव्यांगांची असतील, ४३ मॉडेल, तर ४० हरीत तथा इको फ्रेंडली मतदान केंद्रे असणार आहेत.

Loksabha Election
Goa Loksabha: 50 हजारांपेक्षा जास्त कॅशसाठी वैध कागदपत्र दाखवावे लागणार, 48 भरारी पथकांची पाळत

२४ तास पोलिस तैनात

दक्षिण गोव्यात ११२ तर उत्तर गोव्यात ११५ विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दक्षिण गोव्यात ३७ व उत्तर गोव्यात १६ तपासणी पथकांची स्थापना केली आहे. तपासणी पथक राज्यातील महत्त्वाचे रस्ते, जंक्शन येथे कार्यरत असेल. याविषयी कौशल म्हणाले, उत्तर गोवा भागात येणाऱ्या सहा सीमांवरील तपासनाक्यांवर २४ तास पोलिस तैनात करण्यात आले. मद्य तस्करी किंवा अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

या क्रमांकावर संपर्क साधा

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक काळात कोणालाही गैरप्रकार दिसून आल्यास लगेच ०८३२-२२२५३८३ किंवा ९६९९७९३४६४ या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉटस अॅप संदेश पाठवावा. त्याशिवाय टोल फ्री १९५० क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली आहे. कोणीही तक्रार केल्यास १०० ‌मिनिटांत घटनास्थळी पोहोचून भरारी पथके कारवाई करेल. या भरारी पथकात ३ ते ६ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

जिल्ह्यांत विधानसभा मतदारसंघनिहाय विभागीय अधिकारी तसेच तपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम हे अधिकारी करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com