Loksabha Election Goa : आपल्याला ४४ हजारांचे मताधिक्य : रमाकांत खलप

Loksabha Election Goa : त्यांच्यासोबत यावेळी बाबी बागकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते होते
Ramakant Khalap
Ramakant KhalapDainik Gomantak

Loksabha Election Goa :

पेडणे मतदारांचा सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून मी सुमारे ४४ हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून येईन, असा विश्वास इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी ते पेडणे दौऱ्यावर असताना रविवार, दि.५ रोजी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केला.

त्यांच्यासोबत यावेळी बाबी बागकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते होते

पुढे बोलताना ॲड. खलप म्हणाले की , पेडणे तालुक्यात डोंगर,जमिनीवर अतिक्रमण होत असून त्या स्थानिकांच्या हातून जमिनी व गाव निसटत आहेत. ‘गाव व गोव्याची भूमी ही गोमंतकीयासाठी’ ही संकल्पना निवडून आल्यावर मी राबविणार आहे.

मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ हे प्रकल्प झाले ही आनंदाची गोष्ट, पण ज्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या त्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही, तर काहींना अजिबात मोबादला मिळाला नाही.

Ramakant Khalap
Goa Congress : दुहेरी नागरिकत्वासाठी काँग्रेसची भूमिकाच नाही; थरूर यांची कबुली

लोक विस्थापित झाले. या दोन्ही प्रकल्पात जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अग्रक्रमाने त्यानंतर पेडणे तालुक्यातील व राज्यातील अशा प्राधान्याने रोजगार मिळणे आवश्यक होते. पण त्याबाबत पूर्णपणे भ्रमनिरास झाला.

राज्याची जीवनदायिनी म्हादई नदी गेली. किनारी भागाची पूर्णपणे वाताहात झाली. पर्यटन वाढले. पण तिथे जाणारे रस्ते अरुंद ,चेंजिंग रूम सारख्या सुविधा नाहीत. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. बेकारी वाढलेली आहे. यासाठी विशेष योजना राबविण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com