Loksabha Election : शिरोड्यात भाजपकडून प्रचारात मेहनत ; धेंपेंना मताधिक्य देणार

Loksabha Election : मंत्री सुभाष शिरोडकरांचा निर्धार निवडणूक जाहीर झाल्यापासून शिरोडा मतदारसंघातील चारही गावात भाजपच्या प्रचाराला जोर आलेला आहे.
Pallavi Dhempe
Pallavi DhempeDainik Gomantak

शिरोडा, मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असून शिरोडा मतदारसंघातील बोरी, शिरोडा, पंचवाडी आणि बेतोडा निरंकाल कोनशे कोडार या चारही गावात सुमारे ४५ बुथ असून या बुथावर

शिरोडा भाजप मंडळातर्फे शिरोड्याचे आमदार तथा जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हे सर्व बुथ समित्या भाजपमंडळचे पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपच्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवार पल्लवी धेंपे याचा प्रचार करत आहेत.

निवडणूक जाहीर झाल्यापासून शिरोडा मतदारसंघातील चारही गावात भाजपच्या प्रचाराला जोर आलेला आहे.

सुरवातीला पंचवाडी गावात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, जि.प. सदस्य नारायण कामत, दीपक नाईक बोरकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, चारही गावातील सरपंच, उपसरपंच पंचसदस्य यांनी सभा घेतल्या याच दिवशी बाजार शिरोडा येथे भाजपच्या उमदेवाराच्या प्रचाराची सभा झाली.

बोरी आणि बेतोडा गावात झालेल्या सभेला उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. मात्र, कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी उशिरा जाहीर झाली तसेच प्रचाराला अद्याप जोर आलेला नाही. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा पाढा वाचन आणि शासनाच्या सर्व योजना प्रत्येक व्यक्तीकडे पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी कामकरी वर्ग, युवा वर्ग महिला, विधवा, दिव्यांग व्यक्ती या सर्वच भाजपकडे आकर्षित झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना शेती बागायतीसाठी आर्थिक मदत, विधवा आणि वृध्दांना आर्थिक मदत मिळू लागली आहे. नागरिकांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सर्व प्रकारची मदत मिळत आहे. सुशिक्षित बेरोजगाऱ्यांना स्वतःचे उद्योग व्यवसाय करायला सहकार्य मिळू लागल्याने सर्वच लोक भाजपच्या पाठीशी उभे आहेत.

त्यामानाने भाजपचे प्रतिस्पर्धी खूपच कमी पडताहेत. काही पक्षांचे अस्तित्व या मतदारसंघात भाजपच्या वर्चस्वामुळे कोणीच भाजप विरोधी बोलू शकत नाही, अशी परिस्थिती या मतदारसंघात आहे.

खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि लोकसभेच्या भाजपचा उमेदवार पल्लवी धेंपे आणि मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मतदारसंघातील नागिरकांचे सर्व प्रश्‍न आम्ही सोडवू व अधिकाधिक विकास घडवून आणू असा शब्द दिल्याने तर लोकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

चारही गावातील नागरिक, सरपंच, उपसरपंच जिल्हापंचायत सदस्य आणि भाजपचे कार्यकर्ते मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या बरोबरीने शिरोडा मतदारसंघातून भाजपच्या पल्लवी धेंपे यांना विक्रमी मते मिळवून देण्याच्या तयारीत आहेत.

महादेव नाईक यांच्या घरवापसीकडे लक्ष !

शिरोड्याचे माजी आमदार व माजी मंत्री महादेव नाईक यांची घरवापसी होणार असल्याने तर पक्षाला अधिक बळकटी येणार आहे, असे मतदारसंघात चित्र आहे. बाकीचे पक्ष आपल्यापरीने प्रयत्नशील असले, तरी शिरोडा मतदारसंघाच्या विकासासाठी आखलेले अनेक कोटींचे प्रकल्प, आणि यजना आता साकार होण्याच्या मार्गावर आहेत.

शिवाय शिरोडा गावात मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने मतदारसंघातील विद्यार्थ्यांना झाला. महाविद्यालय, अभियांत्रिकी शिक्षण, वैद्यकीय शिक्षणासाठी अन्य भागात जावे लागत नाही.

Pallavi Dhempe
Goa Tourism Department : गोवा पर्यटन विभागाने घडविले ऐतिहासिक, नैसर्गिक गोवा दर्शन

शिरोडा मतदारसंघ हा पूर्णपणे भाजपमय बनलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे शिरोडा मतदारसंघाचा सर्वदृष्टीने विकास झालेला आहे. राज्याच्या अधिक विकास घडवून आणण्यासाठी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया.

- विश्‍वंभर उर्फ बाप्पा देवारी

भाजपच्या बालेकिल्ला बनलेल्या शिरोडा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक गावात आणि वाड्यावाड्यावरील घरोघरी जाऊन भाजपचे कार्य करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे या बहुसंख्य मताधिक्यांनी विजयी होतील. यात शंकाच नाही. शिरोडातील बहुतेक नागरिक भाजपसोबत खंबीरपणे उभे आहेत.

- सुनील सावकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com