Voting Awareness : डिचोलीत दवंडी देऊन मतदानाबाबत जागृती

Voting Awareness : येत्या ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत डिचोली विधानसभा मतदारसंघातून १०० टक्के मतदान करण्याचे लक्ष्य निवडणूक कार्यालयाने ठेवले आहे.
Voting Awareness
Voting Awareness Dainik Gomantak

Voting Awareness :

डिचोली, ‘घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजवा’ असा संदेश देत डिचोलीच्या निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आज शुक्रवारी खास वाहनाद्वारे दवंडी देत डिचोली शहरात जागृती रॅली काढली.

येत्या ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत डिचोली विधानसभा मतदारसंघातून १०० टक्के मतदान करण्याचे लक्ष्य निवडणूक कार्यालयाने ठेवले आहे.

डिचोलीचे साहायक निवडणूक अधिकारी तथा मामलेदार विमोद दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही दवंडी काढण्यात आली. सरकारी इमारत संकुलाकडून त्‍यास प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक अधिकारी उपस्‍थित होते.

Voting Awareness
Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

कुळागरे, शेती, बागायतीतही जागृती

या जागृती अभियानद्वारे विविध गावांतील शेतात, कुळागरात, काजू बागायतीत जाऊन मजूर, शेतकरी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. महिला मंडळे, शिवणकाम करणाऱ्या महिला तसेच अन्‍य पातळ्‍यांवरही जनसामान्यांशी संपर्क साधून मतदानाचे आवाहन करण्‍यात आले.

दिव्‍यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सुविधांची माहिती मतदारांना दिली. नवमतदारांसाठी पथनाट्याद्वारे जागृती करण्यात आली. याकामी निवडणूक अधिकारी आणि बीएलओंनी सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com