Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न : बाळ्‍ळीत जुने कार्यकर्ते आणि नेत्‍यांसमवेत घेतली बैठक
Cape
Cape Dainik Gomatnak

Cape News :

केपे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांत जी काही प्रमाणात दुफळी आहे ती बुजवून टाकण्‍याचे काम सध्‍या युद्धपातळीवर चालू असून यात माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्‍याबरोबरच दक्षिण गोव्‍यच्या उमेदवार पल्‍लवी धेंपे यांचे यजमान उद्योगपती श्रीनिवास धेंपे तसेच केपेचे युवा उद्योजक याेगेश कुंकळयेकर यांनी पुढाकार घेतला आहे.

मागच्‍या विधानसभा निवडणुकीत जे भाजप कार्यकर्ते भाजपापासून दूर गेले होते त्‍यांना पुन्‍हा पक्षाजवळ आणण्‍याचे काम सध्‍या सुरू झाले अाहे. श्रीनिवास धेंपे यांनी दुसऱ्यांदा यासाठी केपे दौरा केला. काल बाळ्‍ळीच्‍या माजी सरपंच अलका पोतदार यांच्‍या घरी केपे मतदारसंघातील काही जुन्‍या भाजप कार्यकर्त्यांची आणि नेत्‍यांची बैठक झाली.

या बैठकीला स्‍वत: सावईकर व श्रीनिवास धेंपे उपस्‍थित होते. खोलचे सरपंच कृष्‍णा वेळीप, बाळ्‍ळीचे माजी सरपंच भामटू वेळीप तसेच काही बुधवंत या बैठकीला उपस्‍थित होते. यापूर्वी फातर्पा पंचायतीचे माजी सरपंच मोहन फळदेसाई आणि मेदिनी नाईक यांचीही सावईकर व धेंपे यांनी भेट घेतली.

Cape
Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

फातर्पेचे प्रसिद्ध उद्योजक गोविंद देसाई त्‍याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते सदा देसाई आणि रुपेश प्रभुदेसाई यांच्‍याशीही संवाद साधला. त्‍यानंतर शिरवई येथे महिला मंडळाच्‍या कार्यकर्त्यांना भेट देऊन त्‍यांनीही भाजपासाठी काम करावे अशी विनंती त्‍यांना करण्‍यात आली. या महिला मंडळाने आपला पाठिंबा भाजप उमेदवाराला जाहीर केला आहे, असे कुंकळयेकर यांनी यावेळी सांगितले.

मतभेद दूर सारून पक्षकार्य करा : सावईकर

यावेळी दक्षिण गोव्‍यातून भाजपचा उमेदवार जिंकून येणे ही अत्‍यंत गरजेची बाब असून त्‍यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्वीचे काही मतभेद असल्‍यास ते दूर सारून पक्षाकडे परत जवळ यावे, असे आवाहन ॲड. नरेंद्र सावईकर यांनी केले.

तर तुमच्‍या काही अडचणी असल्‍यास त्‍या योगेश कुंकळयेकर यांच्‍या माध्‍यमातून आपल्‍यापर्यंत पोचवा. त्‍या दूर करण्‍यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्‍न करीन, असे श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com