Loksabha Election 2024 : ‘आरजी’च्‍या दोन्‍ही उमेदवारांचे अर्ज दाखल

Loksabha Election 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर आरजीच्‍या कार्यकर्त्यांना येऊ न देता त्यांना समोरील उद्यानात उभे राहण्यास परवानगी दिली होती. दरम्‍यान, दक्षिण गोव्‍यातून रुबर्ट परेरा यांनी आरजीतर्फे अर्ज भरला आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

पणजी, भाजपला ४००च्‍यावर खासदार निवडून आणायचे आहेत, पण ते स्वतःच्या बळावर नाही, तर इतर पक्षांतील गुन्हे असलेल्यांना घेऊन वॉशिंगमधून काढून त्यांच्या बळावर, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब यांनी केला.

उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीसाठी परब यांनी आज गुरुवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमगार वीरेश बोरकर व पक्षाचे इतर पदाधिकारी, युवा वर्ग उपस्थित होता.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर आरजीच्‍या कार्यकर्त्यांना येऊ न देता त्यांना समोरील उद्यानात उभे राहण्यास परवानगी दिली होती. दरम्‍यान, दक्षिण गोव्‍यातून रुबर्ट परेरा यांनी आरजीतर्फे अर्ज भरला आहे.

Loksabha Election 2024
Goa News Update: काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल, मयेची यात्रा, पर्वरीत खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

म्हादई वळवू नये यासाठी ‘इंडिया’ आघाडीने आपल्या राष्ट्रीय जाहीरनाम्यात त्याचा उल्लेखही केला नाही. १९८९ पासून म्हादईचा विषय प्रलंबित आहे. काँग्रेस आणि भाजपनेही म्हादईचा सौदा केला आहे. गोव्याचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी आमची उमेदवारी आहे.

- मनोज परब, ‘आरजी’चे नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com