Loksabha Election 2024 : धेंपेंकडून व्यावसायिकांच्या भेटी; कोपरा बैठकांवर भर

Loksabha Election 2024 : यावेळी आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, अॅड. नरेंद्र सावईकर, जयंत जाधव, गटाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक नारायण बोरकर, अमय चोपडेकर, नगरसेविका देविता आरोलकर, शमी साळकर आदी उपस्थित होते.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

वास्को, दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचा यांनी सोमवारी वास्कोत प्रचार दौरा केला. धेंपे यांनी मुरगाव पालिका मार्केट, वास्को मासळी मार्केट व इतर ठिकाणी जाऊन व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेतल्या.

धेंपे यांचा हा दुसरा दौरा होता. यावेळी आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, अॅड. नरेंद्र सावईकर, जयंत जाधव, गटाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक नारायण बोरकर, अमय चोपडेकर, नगरसेविका देविता आरोलकर, शमी साळकर आदी उपस्थित होते.

पल्लवी धेंपे यांनी दक्षिणेतील जनतेकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून वास्को मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदानाची अपेक्षा व्यक्त केली. पल्लवी धेंपे यांनी जास्त कोपरा बैठकांवर भर दिला आहे. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, अॅड. नरेंद्र सावईकर यांनीही धेंपे यांना भरघोस मतांनी विजयी करून आणण्याचे आवाहन केले.

Loksabha Election 2024
Goa Congress: भाजपचे धोरण 'मिशन टोटल कमिशन'; हाच का मोदींचा विकसीत भारत? खलप यांचा सवाल

ठिकठिकाणी कोपरा सभा

धेंपो यांनी सकाळी देवदर्शन करून प्रचाराला सुरवात केली. त्यांनी टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा व मोटारसायकल पायलटांशी संवाद साधला. त्यानंतर पालिका मार्केटमधील विक्रेते व व्यापारी, संवाद साधला. तसेच फळ-भाजी विक्रेत्यांची भेट घेतली.

दुपारी मेस्तावाडा, वास्को येथील श्री राम मंदिराजवळ कोपरा सभा घेतली. त्यानंतर श्री ब्रह्मस्थळ मंदिराजवळ कोपरा सभा झाली. नवेवाडे येथील हनुमान मंदिराजवळ, वरुणापुरी जंक्शनजवळ, श्री सिद्धलिंगेश्वर मठात, मांगूर येथील देवश्री दर्शन सोसायटी येथे कोपरा सभा घेतली. तसेच वाडे वास्को येथे अल्पसंख्याक समाज घटकांशी संवाद साधला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com