Margao News : पल्‍लवी धेंपेंचा थेट संवाद लाेकांना आकर्षित करणारा; भाजपकडून प्रचाराचा धडाका

Margao News : आज शनिवारी भाजपने मडगाव आणि फातोर्डा या दोन्‍ही मतदारसंघात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या पदयात्रेमध्‍ये मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि त्‍यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
pallavi dhempe
pallavi dhempeDainik Gomantak

Margao News :

मडगाव, दक्षिण गोव्‍यातून पहिल्‍यांदाच महिला खासदार निवडून आणण्‍याचा पण केलेल्‍या भाजपाने दक्षिण गोव्‍यात प्रचाराचा धडाका लावला असून भाजपच्‍या दक्षिण गोव्‍यातील उमेदवार पल्‍लवी धेंपे या लोकांशी आता थेट संवाद साधू लागल्‍याने मतदारांमध्‍ये त्‍यांची लोकप्रियता वाढत आहे. त्‍यामानाने काँग्रेसचा प्रचार बराच मागे असल्‍याचे दिसून येते.

आज शनिवारी भाजपने मडगाव आणि फातोर्डा या दोन्‍ही मतदारसंघात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या पदयात्रेमध्‍ये मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि त्‍यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

लोहिया मैदानावरुन सुरू झालेली ही पदयात्रा मडगावातील विविध ठिकाणी फिरुन मतदारांशी संवाद साधला गेला. अशाच प्रकारची पदयात्रा दामू नाईक यांच्‍या नेतृत्‍वाखाली फातोर्डा येथे आयोजित करण्‍यात आली. त्‍यानंतर रात्री कुंकळ्‍ळी येथे आयोजित प्रचारसभेला लाेकांची मोठी गर्दी उसळली हाेती.

या प्रचारादरम्‍यान, पल्‍लवी धेंपे यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्‍यावर भर दिला आहे. केपेत सभेवेळी त्‍यांनी एसटी महिलांशी संवाद साधून त्‍यांच्‍या समस्‍या जाणल्या. चिमुकल्यांनाही उचलून कडेवर घेतले. त्‍यामुळे मतदारांत त्‍यांची लोकप्रियता वाढली आहे, असे भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले. नावेलीत धेंपे यांच्‍या १५ कोपरा बैठका झाल्‍या,असे आमदार तुयेकर यांनी सांगितले.

श्रीनिवास धेंपेही उतरले मैदानात

उमेदवार पल्‍लवी धेंपे यांचे यजमान आणि गोव्‍यातील प्रसिद्ध उद्याेगपती श्रीनिवास (बाबा) धेंपे हेही आता प्रचाराच्‍या मैदानात उतरले असून त्‍यांनी लोकांच्‍या वैयक्‍तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. धेंपे यांचा फुटबॉल क्‍लब असून कित्येक फुटबॉलपटू आणि क्‍लबशी थेट संबंध असल्‍याने त्यांच्याशी त्यांचा संवाद सुरू आहे.

त्‍यांना आल्‍बर्ट कुलासो यांचे सहकार्य लाभत आहे. धेंपेंनी शुक्रवारी मडगावात सारस्‍वत आणि दैवज्ञ समाज नेत्‍यांशी संवाद साधला. त्‍यापूर्वी केपे आणि कुडचडे भागात त्‍यांनी दाैरा करून तेथील लोकांच्या अडचणी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला.

मोदींच्‍या सभेमुळे कार्यकर्त्‍यांत जोश

यावेळी भाजपने लाेकसभा निवडणुकीचा प्रचार करण्‍यासाठी फार मोठ्या प्रमाणात केंद्रीय नेत्‍यांना बोलावले नसले तरी दक्षिण गोव्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर गोव्‍यात गृहमंत्री अमित शहा यांच्‍या ज्‍या महासभा झाल्‍या त्‍यामुळे भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

या उत्साहाचे मतांमध्ये परिवर्तन करण्यास कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com