Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींचा विश्‍‍वास पात्र ठरवा : पल्लवी धेंपे

Loksabha Election 2024 : कळसई येथे कार्यकर्त्यांना निवडून देण्‍याचे आवाहन
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak

Loksabha Election 2024

कुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला विश्‍‍वासाने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी दिलेली आहे.

त्‍यांचा विश्वास पात्र ठरवण्यासाठी मला मोठ्या मताधिक्‍क्याने विजयी करा, असे आवाहन उमेदवार पल्लवी धेंपे यांनी कळसई येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.

यावेळी भाजप प्रदेक्षाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, ॲड. नरेंद्र सावईकर, आमदार डॉ. गणेश गावकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, धारबांदोडा सरपंच बालाजी गावस, काले सरपंच बबन गावकर, उपसरपंच संघवी नाईक, सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाई, सचिव मच्छिंद्र देसाई, साकोर्डा सरपंच प्रिया खांडेपारकर व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी मला उमेदवार म्हणून सन्मान दिल्याबद्दल त्‍यांचे तसेच राज्‍यातील नेत्‍यांचे मी आभार आहे. आता मोदींचा विश्वास पात्र ठरविण्यासाठी मला तुमच्‍या सहकार्याची गरज आहे. महिलांचे सशक्तीकरण हे केवळ बोलून न दाखविता प्रत्यक्ष कृती करून दाखविणारा भाजप पक्ष आहे, असे पल्लवी धेंपे म्‍हणाल्‍या.

खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, प्रत्‍येक निवडणुकीत सावर्डे मतदारसंघाने भाजपला आघाडी मिळवून दिलेली आहे. आता लोकसभा निवडणुकीतही आम्हाला या मतदारसंघातून मोठी आघाडी मिळणार आहे. दरम्‍यान, यावेळी माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार डॉ. गणेश गावकर यांनीही विचार मांडले.

दरम्‍यान, आज सकाळी धडे-सावर्डे येथील मंदिरात जाऊन पल्लवी धेंपे यांनी श्रींचे दर्शन घेतले. नंतर कळसई-दाभाळ येथील श्री सातेरी पिसान्नी देवी तर दुपारी शिगाव येथील श्री रंगाई शांतादुर्गा देवीचा आशीर्वाद घेतला.

Loksabha Election 2024
Goa Police: पोटच्या मुलीला फेकून दिलेल्‍या आईला जामीन

मगोचे बालाजी गावस भाजपमध्‍ये

धारबांदोड्याचे सरपंच तथा मगो पक्षाचे नेते बालाजी गावस यांनी पंचायतीच्या समर्थक पंचांसमवेत आज भाजपमध्‍ये प्रवेश केला. तसेच काले पंचायतीचे सरपंच बबन गावकर, उपसरपंच संघवी नाईक व बाळू रेकडो यांनाही प्रदेक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपमध्‍ये प्रवेश दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com