Shiroda News : भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येणार : मुख्यमंत्री

Shiroda News : मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या गरजा पुरविण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आखल्या आहेत.
Shiroda
ShirodaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shiroda News :

शिरोडा, लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दोन्ही मतदारसंघात बहुसंख्य मताधिक्यांनी विजयी होतील यात तिळमात्र शंका नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या कारकीर्दीत फक्त जनतेचे हित पाहिले. सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावले पाहिजे हाच त्यांचा ध्यास असून दक्षिण गोवा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पंचवाडी - शिरोडा भागात भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे याचा दौऱ्यावेळी पंचायत सभागृहात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

Shiroda
Gorakhpur To Goa Train: गोरखपूर ते गोवा रेल्वे धावणार; तयारीला वेग, एप्रिलमध्ये महत्वाची बैठक

याप्रसंगी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, उमेदवार पल्लवी धेंपे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, पंचवाडीच्या सरपंच लीना फर्नांडिस, शिरोड्याच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, पंच सदस्य क्रिस्तेव डिकॉस्ता, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, भारती शिरोडकर, डॉ. गौरी शिरोडकर, सुमती नाईक, प्रदीप शेट आदी उपस्थित होते.

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या गरजा पुरविण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आखल्या आहेत. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी गोव्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागून मतदारांना प्रोत्साहीत करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Best beaches in Konkan
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com