Loksabha Election 2024 : अमित शहांची सभा लांबणीवर सदानंद शेट तानावडे

Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्टार प्रचारकांच्या नियोजित सभांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी ‘अबकी बार ४०० पार’ हा नारा दिला आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

म्हापसा लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात गोव्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २४ एप्रिल रोजी सभा होणार होती.

ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असे राज्यसभा खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गोमन्तकला सांगितले.

तानावडे म्हणाले,की अमित शहा यांची २४ रोजी नियोजित सभा पुढे ढकलण्यात आली असली तरी ती २६ नंतर होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी चर्चेनंतर पुढील तारीख जाहीर करण्यात येईल,असेही ते म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्टार प्रचारकांच्या नियोजित सभांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी ‘अबकी बार ४०० पार’ हा नारा दिला आहे.

Loksabha Election 2024
Goa SSC Exam: गोव्यात पूर्णत: अंध विद्यार्थ्याने संगणकाच्या मदतीने कशी दिली दहावीची परीक्षा?

भाजपाने या निवडणुकीसाठी कबंर कसली आहे. अशातच, भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. त्यात महत्त्वाच्या नावांचा समावेश असून उत्तर गोव्यातील म्हापशातील नव्या केटीसी बसस्थानकावर येत्या २४ एप्रिल सायंकाळी ५ वाजता गृहमंत्री अमित शहांची जाहीर प्रचार सभा होणार होती.

उत्तर गोवा हा भाजपासाठी मागील पंचवीस वर्षांपासून बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात भाजपतर्फे सहाव्यांदा श्रीपाद उर्फ भाऊ नाईक हे रिंगणात आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचे अ‍ॅड. रमाकांत खलप, ‘आरजी’चे मनोज परब यांचा समावेश आहे. या उमेदवारांत हे तिरंगी लढत अपेक्षित आहे.

अमित शहा यांची २४ एप्रिल रोजी, आधी सिंधुदुर्गमध्ये भेट देणार होते. सभा लांबणीवर गेल्याने सुधारित औपचारिक वेळापत्रक (शेड्युलिंग) पक्षाकडे एसपीजीकडून आलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच एसपीजीचे एक पथक म्हापशात येऊन पाहणी करून गेले होते. त्यानुसार, केटीसी बसस्थानक ही जागा निश्चित करण्यात आली होती.

पाहणीवेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर, म्हापसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर, वाहतूक निरीक्षक मर्लिन डिसोझा हे हजर होते.

जाहीर सभांसाठी प्रभागनिहाय तयारी

सध्या भाजपाने उत्तर व दक्षिण गोव्यात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. त्यानुसार, दुसऱ्या प्रचार फेरीत भाजप कोपरा बैठका व जाहीर सभांवर भर देणार आहे. पुढील आठवड्यात नरेंद्र मोदी यांची दक्षिणेत जाहीर सभा होणार आहे.

या अमित शहांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उत्तरेतील भाजप आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघात प्रमुख कार्यकर्ते तसेच प्रभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांत जागृती करत आहेत. नियोजित सभेला जास्तीत जास्त गर्दी सभेला व्हावी, याअनुषंगाने भाजपची जोरात तयारी सुरू आहे. पन्ना प्रमुखांसह भाजपचे विविध भागातील कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत.

कॉंग्रेसचा जाहीरनामा हा वास्तवापासून दूर जाणारा आहे. त्यांचा एक उमेदवार विकासाला विरोध करणारा तर दुसरा तीस वर्षे मागच्या विचारात अडकलेला आहे. त्याचे प्रतिबिंब कॉग्रेसच्या जाहीरनाम्यात पडले आहे. जनता या जाहीरनाम्यासकट कॉग्रेसला नाकारणार आहे.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

ज्वलंत प्रश्‍नांबाबत काय बोलणार?

मागील अनेक वर्षांपासून गोवा व कर्नाटक यांच्यातील म्हादई नदीच्या पाणीवाटपाचा वाद सुरू आहे. तसेच, रेल्वे डबल ट्रॅकिंग हे दोन ज्वलंत विषय आहेत.

गृहमंत्री शहा यांची सभा लांबणीवर गेली असली तरी जाहीर सभेत काय बोलणार किंवा गोमंतकीयांना कुठले आश्वासन देतात त्याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com