Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak

Loksabha Election 2024 : ४० हजार मतदार वाढले! महिलांची संख्‍या अधिक

Loksabha Election 2024 : गेल्या ५ जानेवारीला मतदारयादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये आणखी नव्या मतदारांचा समावेश करण्यात आला. १९ एप्रिल २०१४ पर्यंत १९,९४९ अर्ज मतदारयादीत समाविष्‍ट करण्यासाठी आले होते.

Loksabha Election 2024 :

पणजी, लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यातील निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेबरोबरच मतदानकेंद्रांवरील सुविधांचे कामही सुरू झाले आहे.

येत्या ७ मे रोजी गोव्‍यातील दोन जागांसाठी मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सरासरी ४० हजार मतदारांमध्ये वाढ झाली आहे. हे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांचे अधिक आहे. मॉडेल मतदानकेंद्रांची आखणी करण्यात येत आहे.

गोवा पोलिसांसह आणखी सहा निमलष्करी पोलिस दलाच्या तुकड्या लवकरच गोव्यात पोचणार असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली.

गेल्या ५ जानेवारीला मतदारयादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये आणखी नव्या मतदारांचा समावेश करण्यात आला. १९ एप्रिल २०१४ पर्यंत १९,९४९ अर्ज मतदारयादीत समाविष्‍ट करण्यासाठी आले होते. बूथस्तरावरील अधिकाऱ्यांनी (बीएलओ) केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ७५४४ नावे मतदारयादीतून काढून टाकण्यात आली.

त्यामध्ये दिलेल्या पत्त्‍यावर मतदार राहत नसल्याचे, मतदाराचे निधन झाले असल्याचे, इतर मतदारसंघात स्थलांतर केलेले तसेच एकापेक्षा अधिक नावे समावेश असलेल्यांचा समावेश आहे. त्‍यात ३३८६ पुरुष व ४१५८ महिला मतदार आहेत. एकूण २१९४ मतदारांचे निधन झाले आहे. ३३५ मतदारांची नावे दोनवेळा आढळून आली.

त्यात १९२ पुरुष व १४३ महिला आहेत. ३७१ मतदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ३७५ मतदारांचा ठावठिकाणाच सापडलेला नाही तर ४२६९ मतदारांनी स्थलांतर केले आहे. त्यात १८७१ पुरुष मतदार व २३९८ महिला मतदार आहेत.

या निवडणुकीसाठी दोन जिल्हा निवडणूक अधिकारी (जिल्हाधिकारी), प्रत्येक मतदारसंघात एक निवडणूक निर्वाचन अधिकारी (ईआरओ) व एक साहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी (एईआरओ) मिळून ८० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक मतदारसंघात रात्रंदिवस भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्याच्या चेकनाक्यांवर कडक तपासणी होत असल्याने गेल्या काही दिवसांत रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात मद्याचा साठाही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू केली गेली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यामध्ये निमलष्करी दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत. या पोलिसांची परेड प्रत्येक पोलिस स्थानकाच्या कक्षेत काढण्यात आली.

दिव्यांग मतदारांची संख्‍या ९४२३

३७०२ किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या गोव्यात दोन जिल्ह्यांसह १२ तालुके, ३२० गावे, १९२ पंचायती, १३ पालिका व एका महापालिकेचा समावेश आहे.

उत्तर गोव्यातील २० विधानसभा मतदारसंघांत ५ लाख ७१ हजार ६१७ तर दक्षिण गोव्यातील २० मतदारसंघांत ६ लाख ०७ हजार ७१५ मतदार आहेत. याव्यतिरिक्त ९४२३ दिव्यांग मतदार आहेत. त्यातील ४९७७ उत्तरेत तर ४४४६ दक्षिणेत आहेत.

८५ वर्षांवरील ११ हजार ५०२ ज्‍येष्‍ठ मतदार असून त्यांना दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. ते स्वतः कुटुंबीयांसमवेत मतदानकेंद्रावर येऊन मतदान करू शकतात अथवा घरीच मतदान करण्यासाठी अगोदर अर्ज भरून दिल्यावर बीएलओ ती सुविधा त्या दिवशी उपलब्ध करून देईल.

१८ ते १९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ११ हजार ५०२ आहे.

Loksabha Election 2024
Goa Loksabha Election 2024: एकाचीही माघार नाही, गोव्यात 16 उमेदवार रिंगणात; सहाजणांत मुख्य लढत

एकूण १७२५ मतदानकेंद्रे

राज्यातील एकूण १७२५ मतदानकेंद्रांसाठी दहा सरकारी कर्मचारी तसेच सुमारे सात हजार पोलिस ताफा निवडणूक कामामध्ये गुंतलेला आहे. मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठीचा सविस्तर आराखडा पोलिस प्रमुखांकडून मागवण्यात आला आहे.

संवेदनशील व अतिसंवेदनशील प्रभागांचा आढावा घेऊन त्याची माहिती दिल्यानंतर त्या भागात पोलिस व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com