Margao News: ऐन निवडणुकीत‘लोहिया मैदान’बंद; दुरुस्‍तीची सबब

Goa's Ram Lohia Maidan News: या मैदानावर २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वा. ‘गोवा बचाव आंदोलना’ने एक जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र शनिवारी पाऊस पडल्‍याने या मैदानात शॉटसर्किट होऊन वीज यंत्रणा बंद पडली आहे.
Madgaon News: ऐन निवडणुकीत‘लोहिया मैदान’बंद; दुरुस्‍तीची सबब
Lohia Ground in Madgaon Will Ramain Closed Due To Repairing Work is Going OnDainik Gomantak
Published on
Updated on

Madgaon's Lohia Ground News:

मडगाव, गोव्‍यातील अभिव्‍यक्‍तीचे मुख्‍य केंद्र म्‍हणून ज्‍या लोहिया मैदानाकडे पाहिले जायचे. तेच लोहिया मैदान ऐन निवडणुकीची धामधूम चालू असताना दुरुस्‍तीचे कारण पुढे करून मडगाव पालिकेने सभांसाठी ते बंद केले असून त्‍यामुळे विरोधी पक्षाने संताप व्‍यक्‍त केला आहे.

विरोधकांना सभा घेता येऊ नयेत, आणि त्‍यांचा आवाज बंद व्‍हावा यासाठी मुद्दामहून हे कारस्‍थान पालिकेला पुढे करुन सरकारने रचले आहे, असा आरोप केला आहे.

या मैदानावर २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वा. ‘गोवा बचाव आंदोलना’ने एक जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र शनिवारी पाऊस पडल्‍याने या मैदानात शॉटसर्किट होऊन वीज यंत्रणा बंद पडली आहे.

Madgaon News: ऐन निवडणुकीत‘लोहिया मैदान’बंद; दुरुस्‍तीची सबब
Goa HSC Result: गोव्यात बारावीचा निकाल का घटला? शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी सांगितली दोन महत्वाची कारणे

त्‍यामुळे दुरुस्‍तीचे काम हाती घ्‍यायचे आहे, त्‍यासाठी हे मैदान सभांसाठी बंद केले आहे, असे नमूद करुन मडगाव पालिकेचे मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी या सभेला परवानगी नाकारली. १, २ आणि ४ मे असे तीन दिवस प्रदेश काँग्रेसने तसेच ‘आरजी’ आणि भाजपनेही हे मैदान सभेसाठी आरक्षित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com