Ravanfond Flyover : रावणफोंड उड्डाणपुलाचं काम रखडलेलंच; स्थानिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

नुकतेच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही रावणफोंड येथील ओव्हरब्रिज कधीही पडू शकतो, असे वक्तव्य केले होते.
Ravanfond Flyover
Ravanfond FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

Ravanfond Flyover : मडगाव रावणफोंड येथील ओव्हरब्रिजची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे या ओव्हरब्रिजचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी सोमवारी राज्य सरकारकडे केली आहे. नुकतेच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही रावणफोंड येथील ओव्हरब्रिज कधीही पडू शकतो, असे वक्तव्य केले होते. रावणफोंड येथे सहा पदरी पूल बांधण्यासाठी फेरनिविदा यापूर्वीच सुरू करण्यात आली असून येत्या काही दिवसांत निविदा देण्यात येतील अशी अपेक्षा आहे, असंही कामत म्हणाले होते.

'रावणफोंड ओव्हरब्रिज कमकुवत झाला आहे, कारण पुलावर केबल्सशिवाय पाइपलाइन पडलेल्या दिसतात. येथील सहा पदरी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मडगावमधील पूर्वेकडील भागातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटणे अपेक्षित आहे,' असंही दिगंबर कामत म्हणाले होते. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (GSIDC) रावणफोंड येथे सुमारे 54.13 कोटी खर्चाचा सहा पदरी पूल बांधण्यासाठी निविदा काढली आहे. पुलाखालून दररोज अनेक गाड्या जातात. सध्याच्या पुलावरील पाण्याची पाइपलाइन पाहिली जाऊ शकते आणि सहा पदरी पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला ही पाईपलाईन हलवावी लागेल. योजनेनुसार, 54 कोटी रुपयांच्या सहा पदरी पुलाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, जीएसआयडीसी पहिल्या तीन लेन तयार करेल आणि नंतर उर्वरित तीन मार्गांसाठी लेन बनवली जाईल.

Ravanfond Flyover
Goa Shacks Business : सरकारने दिवाळी गिफ्ट म्हणून शुल्कात कपात करण्याची शॅक मालकांची मागणी

सरकार किंवा संबंधित विभागाने औपचारिकतेची प्रक्रिया जलद करणे आवश्यक आहे जेणेकरून काम लवकरात लवकर सुरू होईल, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. रावणफोंड येथील या ओव्हरब्रिजकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सध्याच्या पुलात काही बिघाड झाल्यास मोठी अडचण होईल, असंही स्थानिकांनी स्पष्ट केलं आहे. या पुलावरून अवजड वाहने नियमितपणे धावत असून पुलाचा काही भाग खराब झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचं काय असं सवालच सध्या मडगावात विचारला जात आहे. या प्रकल्पाची पुन्हा निविदा काढली गेली आहे, मात्र सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण ही मडगावकरांसाठी चिंतेची बाब आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com