मडगाव जुन्या बसस्थानकावर अस्वच्छता; आरोग्य धोक्यात

उपाययोजनांची मागणी; गोवा कॅनची आरोग्य खात्याकडे तक्रार
Madgaon Old Bus Stand
Madgaon Old Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव येथील जुन्या बसस्थानकावर केल्या जात असलेल्या अस्वच्छतेबद्दल प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याने गोवा कॅनने चिंता व्यक्त केली आहे. याविषयी त्यांनी मडगाव आरोग्य केंद्राला पत्र पाठवून या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Madgaon Old Bus Stand News Updates)

Madgaon Old Bus Stand
51 बेघरांना सामावून घेण्यासाठी चिंबल ग्रामसभेचा विरोध

या पत्रात नमूद करताना येथे भंगारातील गाड्या ठेवण्यात आल्या असून याबरोबरच या ठिकाणी पाव ऑम्लेट, वडापाव विक्री करत असलेले गाडे आपला कचराही (Garbage) टाकत असतात तसेच येथे भाजीपाला विक्री करीत असलेल्या गाड्याचाही कुजलेला कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरत असल्याने हे सार्वजनिक आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Madgaon Old Bus Stand
51 बेघरांना सामावून घेण्यासाठी चिंबल ग्रामसभेचा विरोध

गोवा कॅनने आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती करताना गोवा सार्वजनिक आरोग्य कायदा 1985, नियम 1987 च्या तरतुदीनुसार येथील परिस्थितीची पाहणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मडगाव (Madgaon) नगरपालिका आणि मडगाव शहर पोलिस स्थानक यांना पत्र पाठवून त्वरित याविषयी कडक पावले उचलण्यात यावी आणि कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच यासंबंधी गोवा कॅनने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित सर्वाना पत्राच्या प्रति पाठविल्या आहेत.

7 जून रोजी जागतिक आरोग्य दिवस असल्याने मडगाव नगरपालिका, शहर पोलिस (Police) कार्यालय, अन्न आणि औषध संचालनालय यांची संयुक्त बैठक बोलावून याविषयी तोडगा काढण्यास प्रयत्न करायला हवे, असे गोवा कॅनने आरोग्य खात्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com