"US पेक्षा भारतात राहणं स्वस्त" परदेशातील महागाईला कंटाळून अमेरिकेला रामराम; 9 वर्षांपासून गोव्यात थाटलाय संसार

US Man in Goa: १७ वेगवेगळ्या देशांमध्ये १५ महिने भटकंती केल्यानंतर त्याने शेवटी गोव्याच्या शांत आणि स्वस्त जीवनशैलीने बस्थान मांडण्याचा निर्णय घेतला
living in India vs US
living in India vs USDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अनेकवेळा तुम्ही परदेशात जाऊन संसार सुरु करणाऱ्या लोकांविषयी ऐकलं असेल. परदेशात जास्ती पैसे कमावता येतात, उत्तम जीवन जगता येतं अशा चर्चा ऐकल्या असतील पण माहितीये का अमेरिकेतील वाढत्या महागाईला कंटाळून एका नागरिकाने तब्बल १२ वर्षांपूर्वीच अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या नऊ वर्षांपासून तो भारतात राहतोय.

अमेरिकेपेक्षा गोवा स्वस्त

इलियट रोझेनबर्ग नावाच्या या वित्तीय सल्लागाराने, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट ब्राझीलला प्रयाण केले. त्यानंतर आशिया खंडातील १७ वेगवेगळ्या देशांमध्ये १५ महिने भटकंती केल्यानंतर त्याने शेवटी गोव्याच्या शांत आणि स्वस्त जीवनशैलीने बस्थान मांडण्याचा निर्णय घेतला.

रोझेनबर्गने सोशल मीडियावर त्याच्या याच अनुभवांबद्दल सांगितलेय. अमेरिकेतील महागड्या जीवनशैलीबद्दल बोलताना त्याने महागाईमुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे किती कठीण आहे, हे त्याने स्पष्ट केलेय. गोव्यातील जीवनशैली अमेरिकेच्या तुलनेत ८० टक्के स्वस्त असल्यामुळे आर्थिक चिंता न करता, व्यवसाय करणे शक्य झाल्याचे त्याने नमूद केले.

अमेरिकेपेक्षा गोव्यातील जीवनशैली कशी उत्तम आहे याचे उदाहरण देताना, त्याने त्याच्या मासिक खर्चाची माहिती दिली. तो म्हणतोय की गोव्यात नदीकाठी दोन बेडरूमचे फर्निचर असलेले घर, जिम आणि स्विमिंग पूलसह फक्त ६३० डॉलर्स म्हणेजच सुमारे ५४,४०० रुपयांत भाड्याने मिळते.

living in India vs US
Goa News: 'केजरीवाल - ममतांचा पक्ष भाजपसाठी काम करतात, गोव्यात त्यांनी निवडणूक लढूच नये'; अंजली निंबाळकरांचा हल्लाबोल

किराणा सामानासाठी २५० डॉलर्स म्हणजे सुमारे २१,६०० रुपये आणि घरकामासाठी सहा दिवसांच्या मदतनीसाचा खर्च ८० डॉलर्स म्हणजे सुमारे ६,९०० रुपयांच्या आसपास जातो. याशिवाय वैयक्तिक प्रशिक्षणासाठी प्रत्येक सत्राला फक्त १० डॉलर्स, भारतीय रुपयांमध्ये ८६० रुपये लागतात.

भारतीय महिलेशी लग्न, गोव्यात संसार


रोझेनबर्गने म्हणतो की, गोव्यात काही अडचणी असल्या तरीही इथे समाधानी आयुष्य जगता येतं. त्याला डॉलरमध्ये उत्पन्न मिळत असल्याने, आर्थिक चिंता न करता व्यवसाय करणे शक्य झाल्याचं तो म्हणालाय. तो अजूनही अमेरिकन नागरिक आहे आणि वर्षातून एकदा अमेरिकेला भेट देतो. अमेरिकेबद्दल प्रेम असले तरी, गोव्यातील शांत जीवनशैलीने नेहमीच आकर्षित करत असल्याचं त्यानं कबुल केलं. 

गोव्यातील जीवनशैलीने रोझेनबर्गला केवळ आर्थिक स्वातंत्र्यच दिले नाही, तर त्याला भारतीय संस्कृती आणि भाषेची ओळखही करून दिलीय. त्याने एका भारतीय महिलेशी लग्न केलंय आणि हिंदी भाषाही शिकलाय. अमेरिकेच्या तुलनेत ८० टक्के स्वस्त आयुष्य गोव्यात जगायला मिळत असल्याने आणि गोव्यातील शांत आणि सुंदर वातावरणात, रोझेनबर्ग आपलं आयुष्य बदलून गेल्याचं म्हणालाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com