मडगावात पहाटेच उघडणारी दारूची दुकाने वाढत्या गुन्हेगारीचे कारण

वाढत्या गुन्हेगारीचे कारण: मजुरांना मिळते हवी तेव्हा मदिरा
मडगावात पहाटेच उघडणारी दारूची दुकाने वाढत्या गुन्हेगारीचे कारण
Published on
Updated on

फातोर्डा: मडगाव नगरपालिका क्षेत्रातील मद्यविक्री करणारी दुकाने आणि बार चक्क पहाटे पाच वाजताच उघडतात. शहरातील अनेक परप्रांतीय मजूर, कामगार या ठिकाणी येऊन दारू ढोसून मगच कामावर जातात. बऱ्याचदा त्यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत होते. त्यामुळे शहरातील दारूची दुकाने, तसेच बार उघडण्याचा वेळेवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी पोलिस खात्याकडे केली आहे. (liquor shops that open early morning in Madgaon are the cause of crime )

मडगावात पहाटेच उघडणारी दारूची दुकाने वाढत्या गुन्हेगारीचे कारण
गोव्यात 'ओला'साठी सरकार सकारात्मक

मडगाव येथील रविराज हॉटेल येथे झालेला खून हा त्याचाच एक भाग आहे. रविराज हॉटेल येथे दोन मजुरांचे दारूच्या नशेत भांडण झाले. त्याचे पर्यवसान एकाच्या खुनात झाले होते. या प्रकारावरून भल्या पहाटे उघडणारी दारूची दुकाने आणि त्या अनुषंगाने उदभवणारी गुन्हेगारी या विषयाला तोंड फुटले आहे. दारूची दुकाने, तसेच बार केव्हा खुली करायची, याविषयी अबकारी खात्याचे बंधन असते. मात्र, हे बार चक्क पहाटेच्या वेळी उघडले जातात. याविषयी मडगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सचिन नार्वेकर आणि अबकारी निरीक्षक शांबा नाईक यांच्याशी चर्चा करून या विषयात लक्ष घालण्याची मागणी आमोणकर यांनी केली आहे.

मडगावात पहाटेच उघडणारी दारूची दुकाने वाढत्या गुन्हेगारीचे कारण
गोव्यात कोरोनाचे दोन बळी; नव्या 112 रुग्णांची भर

या ठिकाणची दुकाने उघडतात पहाटे

सकाळी परप्रांतीय मजूर, कामगार येथे मद्यपान करूनच कामाच्या शोधात चौकाचौकांत थांबतात. खासकरून सिने लता परिसर, खारेबांध परिसर, गांधी मार्केट परिसर, गोवा गेस्ट हाऊस या ठिकाणची दुकाने, बार पहाटेच्या वेळी खुली करण्यात येतात. या ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवावी, अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे.

मजुरीच्या कारणावरून होतात तंटे

मडगाव पालिकेच्या मागे पहाटेच्या वेळी हे मजूर, कामगार काम मिळावे यासाठी जमतात. यावेळी काम मिळवण्यासाठी मजुरांमध्ये रस्सीखेच होते. यादरम्यान एकाला काम मिळते आणि एकाला मिळत नाही. त्यामुळे काम मिळाले नाही म्हणून मजुरांमध्ये भांडणे होतात. अशावेळी एखादे प्रकरण हातघाईवर जाते आणि नंतर खुनासारखे गैरप्रकार घडतात, असे आमोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com