Goa Liquor Price: गोव्यात सर्वात स्वस्त तर कर्नाटकात महाग! अशा आहेत देशातील वेगवेगळ्या राज्यात मद्याच्या किंमती

Goa Liquor Price: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांसोबतच इथे मिळणारी स्वस्त दारू हे अनेकजण गोव्यात येण्यामागील महत्वाचे कारण आहे
Liquor Price List in Country
Liquor Price List in CountryDainik Gomantak
Published on
Updated on

Liquor Price List in Country: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांसोबतच इथे मिळणारे स्वस्त मद्य हे अनेकजण गोव्यात येण्यामागील महत्वाचे कारण आहे. इथे दारूवरील कर नाममात्र असल्यामुळे किमती स्वस्त आहेत.

माहितीनुसार, भारतात देशातील सर्वात स्वस्त दारू गोव्यात मिळते. तर दुसरीकडे, शेजारील राज्य म्हणजे कर्नाटकात देशातील सर्वात महाग दारू मिळते. इथे दारूवरील कर सगळ्यात जास्त आहेत.

Liquor Price List in Country
Goa BITS Pilani: राज्यातील विद्यार्थ्याला वर्षाला 60 लाख पगार! देशांतर्गत देऊ केलेले सर्वोच्च पगाराचे पॅकेज

उद्योग संस्था द इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन्स असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबतचे खास विश्लेषण समोर आणले आहे.

ज्या मद्याची किंमत गोव्यात 100 रुपये आहे, त्याची दिल्लीतील किंमत 134 रुपये आणि कर्नाटकमध्ये 513 रुपये आहे. या किमतीच्या फरकातून प्रत्येक राज्यात किती कर आकारले जातात, हे कळू शकते.

गोव्यात दारूच्या मूळ किमतीवर 49 टक्के कर आकारला जातो, तर तोच कर कर्नाटकात 83 टक्के आणि महाराष्ट्रातील 71 टक्के आहे.

स्थानिक करांच्या परिणामी, दिल्ली आणि मुंबईतील लोकप्रिय स्कॉच ब्रँड बाटलीच्या किमतीत 20 टक्क्यांपेक्षा जास्त फरक असू शकतो. उदाहरणार्थ, दिल्लीत 3,100 रुपयांची ब्लॅक लेबलची बॉटल मुंबईत सुमारे 4,000 रुपयांना विकली जाते.

अशा आहेत राज्यांमधील मद्याच्या किमती

Liquor Price List in Country
Liquor Price List in CountryDainik Gomantak

राज्याच्या सीमा ओलांडून मद्याची तस्करी होण्यामागे करांमधील प्रचंड तफावत हे देखील एक कारण आहे, असे समोर आले आहे. बहुतांश वस्तू आणि सेवांप्रमाणेच, मद्य आणि पेट्रोलियम या वस्तू सध्या जीएसटीच्या बाहेर आहेत.

देशात शुल्क आणि कराचे दर आहेत. जेव्हा राज्यांचे महसूल नियंत्रण डगमगते तेव्हा अर्थमंत्री मद्यावरील शुल्क आणि पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढवतात.

देशात मद्याच्या बाबतीत सर्वोच्च किमती कर्नाटक राज्यात असून सगळ्यात स्वस्त दारू गोव्यात मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com