Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलाचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होण्याची शक्यता

आलेक्‍स सिक्वेरा यांचे समर्थक सुखावले
Goa Assembly Monsoon Session
Goa Assembly Monsoon SessionDainik Gomantak

Goa Cabinet Reshuffle: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील जागा जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या फर्मागुढी-फोंडा येथील 16 एप्रिल रोजीच्या जाहीर सभेनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्‍या नव्या माहितीनुसार, 10 मेपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच तसे संकेत दिले आहेत.

Goa Assembly Monsoon Session
Goa Accident News : दुर्दैवी; अपघातातून बचावला मात्र लिफ्ट बेतली जीवावर!

मुख्यमंत्री सावंत यांनी आज आपला सुवर्णमहोत्‍सवी (50वा) वाढदिवस साजरा केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील.

सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथे 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच 10 मेपूर्वी गोवा मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात.

नव्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यात आलेक्स सिक्वेरा यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना मंत्रिमंडळात निश्‍चितच स्थान मिळेल, हे पक्के मानले जात आहे.

दुसरे नाव आहे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे. तथापि, कामत हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यापेक्षाही केंद्रात भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Monsoon Session
MLA Disqualification Petition : याचिका आमदारच दाखल करू शकतो! 8 आमदारांचा अर्ज

दरम्‍यान, सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान दिले तर सध्याच्या मंत्रिमंडळातील कुणाला तरी वगळावे लागणार आहे. त्‍यात अनेकांचे नावे पुढे आली असली तरी आमदार नीठकंळ हळर्णकर यांचे नाव सर्वांत पुढे आहे.

"सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथे 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच 10 मेपूर्वी गोवा मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com