Goa Weather Update: गोव्यात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान गोव्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज गोवा हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर किंवा दक्षिण गोव्यात कोणताही हवामान संबधित इशारा खात्याने दिलेला नाही. पेडणे, म्हापसा, साखळी आणि वाळपई भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Goa Monsoon Update
Goa Corona Update: गोव्यात आज एका कोरोना रूग्णांचा मृत्यू, नव्या 52 रूग्णांची नोंद

गोव्यातील दक्षिण-पश्चिम पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. उत्तर व दक्षिण गोवा आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी 40 ते 50 कि.मी प्रतितास वेगाने वारे वाहतील. असे हवामान खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच, 16 ऑगस्ट रोजी वेंगुर्ला ते वास्को या समुद्र किनारा पट्ट्यात 2.5 ते 2.8 मीटर पर्यंत लाटांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून गोव्यात पावसाचा जोर ओसराला आहे. अधुनमधून येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी सोडल्या तर, जोरदार पाऊस झालेला नाही. तसेच, येत्या काही दिवसांत देखील मुसळधार पावसाचा कोणताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com