पणजी: गोवा राज्यात पुढील पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. या हंगामातला पाऊस संपण्याला अवघे सात-आठ दिवस उरले असून मान्सूनचा पाऊस मंदावला असून धुके आणि थंडीतला गारवा वाढू लागला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सरासरी पावसाची तूट वाढतच असून आज ती 7.9 टक्के इतकी झाली आहे.
(Light to moderate rain likely next five days in goa)
2922.7 मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना केवळ 2692.6 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 7.9 टक्के कमी झाला आहे. गेल्या 24 तासात केवळ 1.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात केवळ सांगे येथे 5 मिमी.केपे येथे 5 मिमी. तर मुरगाव येथे 3.8 मिमी. पाऊस झाला आहे. अन्यत्र पाऊस पडला नाही .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.