Goa Government: सफाई कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू करू

Goa Government: राष्ट्रीय आयोगाचे आश्वासन: सफाई कामगारांच्या जाणून घेतल्या समस्या
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: राज्‍यात सफाई कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू करण्‍यासंबंधी प्रयत्‍न केले जातील, असे राष्‍ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, सामाजिक न्‍याय आणि सक्षमीकरण आयोगाचे अध्‍यक्ष एम. व्‍यंकटेशन यांनी सांगितले. येथील माथानी साल्‍ढाणा संकुलात राज्‍यातील सफाई कर्मचाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्‍या समस्‍या ऐकून घेतल्‍यानंतर ते बोलत होते.

Goa Government
Goa SGPDA: ‘एसजीपीडीए’व पालिकेकडून मासळी मार्केटची पाहणी

सफाई कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्‍यात यावे, अशी मागणी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्‍यासाठी आपल्‍या कार्यालयातून पत्रव्‍यवहार करण्‍यात येईल, असे व्‍यंकटेशन म्‍हणाले. यावेळी दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी आश्‍‍वीन चंद्रू ए., समाज कल्‍याण खात्‍याचे संचालक अजित पंचवाडकर, दक्षिण गोवा अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीनेत कोठावळे उपस्‍थित होते.

गोव्‍यातील अनेक नगरपालिकांमध्‍ये सफाई कर्मचाऱ्यांना वेगवेगळे वेतन देण्‍यात येते, अशी माहिती आपल्‍याला सफाई कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे,

असे आयोगाचे अध्यक्ष व्‍यंकटेशन यांनी सांगितले.

‘शॅडो कौन्सिल’चे आयोगाला निवेदन

शॅडो कौन्‍सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांनी सफाई कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या विविध मागण्‍यांचे निवेदन सफाई राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेशन दिले. सफाई कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करण्‍यात यावे, असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission
Contract Workers Salary Rules
8th Pay Commission
8th Pay Commission Memorandum Last Date 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com