शेतकरी संघटनेनं आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात कमी प्रतिसाद

देशातील शेतकरी संघटना व कामगार संघटना यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात (Goa) प्रतिसाद मिळाला नाही.
शेतकरी संघटनेनं आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात कमी प्रतिसाद
शेतकरी संघटनेनं आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात कमी प्रतिसाद Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशातील (country's) शेतकरी संघटना व कामगार संघटना (farmers' unions and trade unions) यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला (Bharat Banda) गोव्यात (Goa) प्रतिसाद मिळाला नाही. गोव्यात आयटक या कामगार संघटनने गोव्यात भारत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. स्वत: आयटकने काही ठिकाणी औद्योगीक वसाहतीच्या बाहेर व काही खाण कंपण्याच्या बाहेर कामगारांंना घेऊन निदर्शने केली तेवढेच.

शेतकरी संघटनेनं आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात कमी प्रतिसाद
अतिथी देवो भव् तत्वानुसार  सरकार पर्यटकांचे हीतरक्षण करणार 'मुख्यमंत्री डॉ. सावंत'

मात्र राज्यातील पणजीसह इतर सर्वच शहरातील जनजिवन सुरळीत सुरु होते. दुकाने बंद नव्हती, की बाजार बंद नव्हते. कुठेही रस्त्यावर वर्दळ कमी झालेली नव्हती. सर्व बॅंकाचे व सरकारी कार्यालयाचे व्यावहार सुरळीत सुरु होते. बस वाहतूक व टॅक्सी वाहतूकही सुरु होती. औद्योगीक वसाहतीतील उद्योगही सुरु होते.

दरम्यान बॅंक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष नाईक जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बॅंकांनी कामकाज बंद ठेवले नाही. बॅंका सुरु होत्या. मात्र बॅंक कर्मचारी संघटनेचा भारत बंदला नैतीक पाठिबा होता. अशी माहिती नाईक जॉर्ज यांनी दिली.

30 रोजी महामेळावा व धरणे

भारत बंद आंदोलनाचा भाग म्हणून आयटकद्वारे ३० सप्टेंबर रोजी पणजी येथील आझाद मैदानावर सकाळी 10 वाजल्यापसून कामगार महामेळावा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

42 Percent Cooperative Societies Closed
PM Matsya Sampada Yojana Goa
NEP Implementation In Goa
Yuri Alemao Opposition Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com