Leopard In Goa: बेतोडा-निरंकाल भागात बिबट्याचा संचार वाढला

Leopard Attack: एका पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून जखमी केले
Leopard Attack: एका पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून जखमी केले
Leopard In GoaDainik Gomanak

बेतोडा पंचायत क्षेत्रातील निरंकाल भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यामुळे संचार स्थानिकासाठी डोकेदुखी वाढली आहे. बिबट्याने सोमवारी सायंकाळी गवळवाडा येथील पास्कोल रॉड्रिग्स यांच्या घरातील एका पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून जखमी केले.

इतर ३ पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्याने बिबट्याने तेथून पळ काढला; पण मंगळवारी सकाळी पुन्हा बिबट्या घराजवळ आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने सोमवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास एका पाळीव कुत्र्यावर झडप घातली; पण इतर ३ पाळीव कुत्र्यांनी बिबट्यांवर प्रतिहल्ला केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.

त्यावेळी एक पाळीव कुत्रा जखमी झाला. परंतु मंगळवारी सकाळी पुन्हा बिबट्या पास्कोल रॉड्रिग्स यांच्या घराजवळ आल्याने परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्याला जखमी केल्याची माहिती पास्कोल रॉड्रिग्स यांनी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना दिली होती.

पण मंगळवारी सायंकाळपर्यंत वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात जाऊन पाहणी केली नसल्याने स्थानिक लोक संताप व्यक्त करीत आहेत.

Leopard Attack: एका पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून जखमी केले
Leopard In Goa: अखेर तो सापडलाच! डिचोली धबधब्यानजीकच्या भागात फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश

पाळीव कुत्र्यांची शिकार

गेल्या काही दिवसांपासून निरंकाल भागातील कोनसे, सातेरीमळ, गवळवाडा, शिगणेव्हाळ व मायणे भागात बिबट्याने रात्रीच्यावेळी घरातील पाळीव कुत्र्यांची शिकार केली आहे. गवळवाडा येथील पास्कोल रॉड्रिग्स यांच्या घरातील एक पाळीव कुत्रा काही दिवसांपूर्वी बिबट्याने ठार केला होता. पास्कोल रॉड्रिग्स यांच्या घरात एकूण ६ पाळीव कुत्रे होते. त्यापैकी दोन पाळीव कुत्र्यांची यापूर्वीच बिबट्याने शिकार केली होती. सोमवारी बिबट्याने जखमी केलेल्या पाळीव कुत्र्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com