Leopard In Goa: अखेर तो सापडलाच! डिचोली धबधब्यानजीकच्या भागात फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश

Leopard In Goa: काही महिन्यांपूर्वी मुळगाव येथे फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले आहे.
Leopard in Goa
Leopard in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Leopard In Goa: मागील काही दिवसांपासून डिचोली तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. काही महिन्यांपूर्वी मुळगाव येथे फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले आहे.

डिचोली धबधब्यानजीकच्या भागात दिवसाढवळ्या फिरणारा बिबटा काही लोकांनी पहिला होता. 2-3 दिवसांपूर्वी पुन्हा या बिबट्याचा वावर धबधब्यानजीकच्या भागात वाढल्याने ग्रामस्थांनी या घटनेची खबर वनखात्याला दिली.

Leopard in Goa
आवाज कमी कर डीजे तुला...! मांद्रे, मोरजीत रात्रौ 10 नंतरही पार्ट्यां सुरुच; प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिक हैराण

वन अधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीने घटनास्थळी पोहोचत रात्री पिंजरा लावला होता. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास तो बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला असून वनखात्याच्या प्रयत्नांना याकामी अखेर यश आले आहे.

असून या पकडलेल्या बिबट्याला बोंडला येथील नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेय.

डिचोलीच्या ग्रामीण भागात बिबटे फिरत असल्याचे येथील ग्रामस्थांनी पहिले आहे. तसेच काही भागातील कुत्र्यांना बिबट्याने फस्त केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या.

गोव्यातील ग्रामीण भागात बिबट्या, वाघासारखे वन्यजीव फिरत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी चंदेल हसापूर येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला चढवला होता.

जंगलांची संख्या कमी झाल्यानेच वन्यजीव अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे सरकत असल्याचे सिद्ध झाले असून डिचोली, वाळपई, पेडणे या भागातील गावात अशा घटनांची तीव्रता अधिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com