Leopard At Arambol: 14 दिवसानंतर 'तो' बिबट्या जेरबंद! नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास; वनखात्याचे प्रयत्न फळास

Leopard In Goa: नानोस्करवाडा भागात वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटा जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
Leopard
LeopardDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: येथील नानोस्करवाडा भागात वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटा जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. तब्बल १४ दिवसानंतर पिंजऱ्यात बिबट्या अडकला. हा बिबटा ११-१२ महिन्यांचा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

सागर नानोस्कर यांच्या घराच्या बाजूस लावलेल्या सापळ्यात हा बिबट्या पहाटे तीनच्या सुमारास अडकला. दरम्यान, गुरुवारी सकाळी वन अधिकारी स्नेहल साळगावकर यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पिंजऱ्यासह बिबट्याला तिथून हलवण्यात आले. यावेळी वनरक्षक अविनाश परब, जितेंद्र नाईक तसेच सागर नानोस्कर आदींनी यांनी सहकार्य केले.

Leopard
Leopard Attack: चिंता वाढली! मध्यरात्री बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा; हरमलमधील थरार CCTV मध्ये कैद

गेल्या आठवड्यात मधलावाडा येथील मर्सेलिन फर्नांडिस यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने फस्त केले होते. त्यामुळे बिबटा जेरबंद झाल्याने नागरिकांनी निःश्वास सोडला आहे.

Leopard
Leopard Attack: अंगणात झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याची झडप; मध्यरात्रीचा थरार सीसीटीव्हीत कैद

नानोस्करवाड्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकात कमालीची अस्वस्थता पसरली होती. स्थानिक तसेच देशी-विदेशी पर्यटक टेम्पल रोडचा वापर करीत असतात. त्या मार्गातील या घरांच्या अंगणात, बिबट्यापासून धोका निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com