lemon Rate : आरोग्यदायी लिंबू झाला ‘आंबट’ ; प्रतिनग 7 रुपये बाजारपेठांत मोठा तुटवडा

असंतुलीत हवामानामुळे लिंबू पिकावर परिणाम झाला असल्याने लिंबू महाग झाले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांकडून मिळाली आहे.
lemon
lemonDainik Gomantak
Published on
Updated on

lemon Rate : डिचोली दैनंदिन वापरातील वस्तू महाग झाल्या असतानाच, आरोग्यदायी गुणधर्म असलेला लिंबूही आता ‘आंबट’ झाला आहे. सध्या बाजारात चांगल्या प्रतीचा लिंबू प्रतिनग ७ रुपये या दराने विकण्यात येत आहे.

आहारातील एक महत्त्‍वाचा घटक असलेला लिंबू आणखी काही दिवस तरी आंबटच राहण्याची शक्यता आहे. तसे संकेतही काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. उकाडा असह्य झाला की अनेकजण लिंबू सरबत पसंद करतात. मात्र लिंबू महाग झाल्याने आता लिंबू सरबतही आंबट होण्याची शक्‍यता आहे.

डिचोलीच्या बाजारात स्थानिक बागायतींनी पिकणाऱ्या गावठी लिंबूसह कर्नाटक राज्यातील बिजापूर येथून लिंबूची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या मात्र लिंबूचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आज (बुधवारी) आठवडी बाजारात तर लिंबूचे प्रमाण कमी होते. असंतुलीत हवामानामुळे लिंबू पिकावर परिणाम झाला असल्याने लिंबू महाग झाले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांकडून मिळाली आहे.

दरम्‍यान, राज्‍यात उकाडा वाढत चालला आहे. ‘ऑक्‍टोबर हिट’मुळे लोक हैराण झालेले आहेत. साहजिकच शीतपेयांची मागणी वाढली असून लिंबाचे दरही भडकले आहेत.

lemon
Agriculture News : कामगारांना सोबत घेत अवलियाने फुलवला पडिक जागेत भाजीचा मळा

औषधी गुणधर्म

लिंबू दिसायला जरी छोटा असला, तरी त्याचे फायदे अनेक व मोठे आहेत. विविध जीवनसत्वामुळे लिंबू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

फक्त उन्हाळ्यातच नव्हे, तर हिवाळ्यातही लिंबू सेवन केल्यास शरीराला फायदा होतो. लिंबूमध्ये आढळणाऱ्या व्‍हिटॅमीन-सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

लिंबूत असलेल्या पेक्टिन फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी असतो. हृदयासाठीही लिंबू वरदान आहे, असे या चिमुकल्‍या लिंबूचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com