पणजी - राज्यातील खाणपट्ट्यांच्या याचिकेवरील महत्त्वाची सुनावणी ४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती एम. आर. शहा व न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पीठासमोर येणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात खाण व्यवसाय बंद असल्याने या सुनावणीकडे राज्यातील खाण अवलंबितांचे लक्ष लागून राहिले आहे.
सेझा गोवा, गोवा सरकार, फोमेंतो व २६ पंचायतींनी राज्यातील खाण व्यवसाय सुरू व्हावा तसेच ८८ खाणपट्टे रद्द करण्यासंदर्भात दिलेला निवाडा मागे घेण्यात यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांद्वारे केला आहे. ही सुनावणी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इंद्र बॅनर्जी, न्यायमूर्ती चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या पीठासमोर येत होती. मात्र, आता ती नव्या पीठासमोर येणार आहे. सरकारने या सुनावणीवेळी राज्यातील खाण व्यवसाय सुरू होण्यासाठी बाजू मांडण्याची तयारी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.