मांद्रे मतदारसंघातून विद्यमान आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि मगोचे जीत आरोलकर या तगड्या उमेदवारांसमोर गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, आम आदमी पक्षाचे प्रसाद शहापूरकर, आरजीच्या सुनयना गावडे व शिवसेनेचे बाबली नाईक या नव्या चेहऱ्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे सहा निवडणुकांचा अनुभव आहे, तर आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे पाच लढतींचा अनुभव आहे. तर मगोचे जीत आरोलकर यांना 2019 च्या पोटनिवडणुकीचा अनुभव आहे. (laxmikant parsekar going to contest an independent election, it tough challenge for leaders In goa assembly Election)
मांद्रेतून Mandrem माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने मगोचे आरोलकर आणि भाजपचे सोपटे या दोन्ही नेत्यांना संघर्ष करावा लागणार आहे.
आमदार दयानंद सोपटे Dayanand Sopate यांच्या विरोधी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तर यापूर्वीच म्हटले आहे. पाच वर्षात आमदार दयानंद सोपटे यांनी काहीच विकास केला नाही, असा दावा करून उर्वरित विकासासाठी आम्हाला निवडून द्या, असे जवळ जवळ सर्वच उमेदवारांनी जनतेला आवाहन केले आहे. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर laxmikant parsekar यांनी तुये हॉस्पिटल, आयटी प्रकल्प, 30 एमएलडी पाणी प्रकल्प,केरी-तेरेखोल पूल, हे प्रकल्प मागच्या पाच वर्षात पूर्ण होऊ शकले नाहीत, ते प्रकल्प पुढे नेण्यासाठी आपल्याला केवळ आमदारकी हवी, अशी विनवणी पार्सेकर आपल्या समर्थकांसोबत मतदारांना करत आहेत.
निवृत्ती शिरोडकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.