Law Students Third Year Admission: लाॅच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 5 विषयांत अनुत्तीर्णांनाही तृतीय वर्षात मिळणार प्रवेश

Law Students Admission: लाॅच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 5 विषयांत अनुत्तीर्णांनाही तृतीय वर्षात मिळणार प्रवेश
Law Students Third Year Admission
Law Students Third Year AdmissionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कायदा पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या ते चौथ्या सत्रांमध्ये एकूण पाचपर्यंत विषयांमध्ये अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच चौथ्या सत्राच्या व पुनर्परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार असून, त्यामुळे कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर गोवा विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून, एनएसयूआयच्या अथक प्रयत्नांमुळे गोवा विद्यापीठाने अध्यादेशांतर्गत एकवेळची विशेष शिथिलता मंजूर केली आहे.

या निर्णयामुळे शेकडो कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर आलेले संकट दूर झाले असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Law Students Third Year Admission
Goa Konkani Theatre: कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीने टाकले सुवर्णमहोत्सवी पाऊल; 50 वर्षांचा सांस्कृतिक प्रवास

श्रेयवादासाठी धडपड

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपणच प्रयत्न केल्याचा दावा भारतीय जनता युवा मोर्चा आणि एनएसयूआयने केला आहे. आपल्याच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, विद्यापीठ प्रशासनाशी झालेल्या चर्चा तसेच कुलगुरू कार्यालयासमोर करण्यात आलेल्या घेराव आंदोलनानंतर ही विशेष सवलत मंजूर केली आहे, असा त्यांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com