Goa Corona Update: गोव्यात कोरोनाची आजवरील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

नव्या 30 कोरोना रुग्णांची नोंद; एका रुग्णाचा मृत्यू
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Updates: गेल्या चोवीस तासात राज्यात नव्या 30 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे; तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग राज्यामध्ये बराच नियंत्रणाखाली आल्याने राज्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. 4 कोरोना रुग्णांची (Corona Patients) रवानगी इस्पितळात उपचारासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 2.82 टक्क्यांवर आले आहे. 221 रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या चोविस तासात 1061 कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये 30 जण नवे संक्रमणित रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यात कोरोना संसर्ग असलेले 2141 रुग्ण आहेत तर बरे होण्याचे प्रमाणही बरेच वाढले आहे व ते 97.58 टक्के झाले आहे. राज्यात निवडणूक प्रचारावेळी (Election Campaign) झालेल्या सभांना लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्‍थिती लावूनही हे प्रमाण वाढले नाही तर उलट बरेच खाली आहे. त्यामुळे गोवा राज्य या एकंदर परिस्थितीवरून कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित असल्याची लक्षणे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com