मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील मरडीवाडा या मुख्य रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला असून तो अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सदर रस्त्यावर कोको आर्ट गॅलरीसमोर हा खड्डा मे महिन्यात जलवाहिनीचे काम करताना पडला आहे.
परंतु तो वेळीच बुजवला न गेल्यामुळे आता त्याचा आकार मोठा झाला असून दर दिवशी या खड्ड्यात पडून अनेक जण जखमी होतात. तसेच अनेकांची वाहने मोडकळीस आलेली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच खड्ड्यात पडून उदय नागवेकर हा युवक गंभीर जखमी झाला.
दरम्यान, स्थानिक युवक सोनू शेटगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, रात्रीच्या वेळी मोठा आवाज झाला की आम्हाला उठून कुणाच्या तरी मदतीला धावून जावे लागते. पंचायत आणि साबांखाचेही रस्त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.