Anmod Ghat: महाराष्ट्र, कर्नाटकात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक खोळंबली; अनमोड घाटात दरड कोसळली

Landslide On Goa Karnataka Road: गोवा आणि कर्नाटकला जोडणारा अनमोड घाट महत्वाचा मार्ग आहे.
Anmod Ghat: अनमोड घाटातून कोल्हापूर, बेळगावात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
Anmod GhatDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातून कोल्हापूर, बेळगावात प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून, अनमोड घाटात दरड कोसळ्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी (१८ जुलै) सकाळी ही घटना घडली असून, दरड हटविण्याचे काम सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अनमोड घाटात दुधसागर देवालयाच्या परीसरात दरड कोसळली. यामुळे मोले ते बेळगाव राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. दक्षिण गोव्यातून बेळगावमार्गे कर्नाटक आणि कोल्हापूरला जाण्यासाठी अनमोड घाटातून जावे लागते दरम्यान, दरड कोसळल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर माती रस्त्यावर आला असून, ती हटविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. माती हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दुपारपर्यंत वेळ लागण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गोवा आणि कर्नाटकला जोडणारा अनमोड घाट महत्वाचा मार्ग आहे. यामार्गे बेळगाव, खानापूर आणि कोल्हापूरला जाण्यासाठी वापरला जातो.

Anmod Ghat: अनमोड घाटातून कोल्हापूर, बेळगावात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
Goa Assembly Session: गोवा Miles X स्थानिक टॅक्सी चालकांचा वाद; आर्लेकरांच्या बाऊन्सवर मंत्र्यांची फटकेबाजी, शेवटी CM यांची मध्यस्थी

रगाडा नदीला पूर, साकोर्डा मधलावाडा - बोळकर्णे रस्ता पाण्याखाली

गोव्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सत्तरीला पावसाने झोडपल्याने रगाडा नदीत पूर आला असून, साकोर्डा मधलावाडा - बोळकर्णे रस्ता पाण्याखाली गेला आहे.

तसेच देऊळमळ पुलावरुन पाणी वाहत असल्याने बोळकर्णे, तांबडीसुर्ला तसेच गुळेली वाळपई मार्गे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com