Anjuna Land Grabb Case: हणजूणेत बनावट दस्तावेज बनवून हपडली जमीन; 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंद

एकसदस्यीय आयोगासमोर सुनावणी; 'एसआयटी'ची माहिती
Anjuna Land Grab cases
Anjuna Land Grab casesDainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna Land Grabb Case: मूळ जमिनीच्या मालकाचे दस्तावेज बनवून त्याची विक्री केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) सहाजणांविरुद्ध फसवणूक, बनवेगिरी तसेच कटकारस्थानचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयितांना अटक करण्यात आली नसली तरी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या जमीन हडप प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची सुनावणी एकसदस्यीय आयोगासमोर सुरू झाली आहे.

Anjuna Land Grab cases
Kadamba Mazi Bus: माझी बस योजना हा 'कदंब'च्या खासगीकरणाचा डाव; बसचालक संघटनेचा आरोप

प्रासवाडा-हणजूण येथील सर्वे क्रमांक 538/5 व सर्वे क्रमांक 537/12 मधील मूळ जमिनीच्या मालकीण पेट्रिसिया डिसोझा यांच्यावतीने ॲटर्नीचा अधिकार असलेल्या प्रदीप सूर्यकांत हरमलकर यांनी ‘एसआयटी’कडे तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीमध्ये रोझा मारिया डिसोझा, इस्टेव्हन डिसोझा, अनिल गोयल, महम्मद सोहेल, अमन ची, ओमप्रकाश मदन्ना यांची नावे आहेत.

संशयितांनी कट रचून पेट्रिसिया डिसोझा यांच्या मालकीच्या जमिनीचे बोगस दस्तावेज तयार करून ते मामलेदार कार्यालयात म्युटेशनसाठी सादर केले. त्यानंतर बनावट दस्तावेजाच्या आधारे ही जमीन संशयितांनी आपल्या मालकीची करून घेऊन त्याची विक्री केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com