Ponda News
Ponda NewsDainik Gomantak

Ponda News: ललितप्रभेची संगीत स्पर्धा उत्साहात

वळवई व सावईवेरे पंचक्रोशी मर्यादित शास्त्रीय संगीत तसेच वादन स्पर्धा घेण्यात आली

वळवई येथील ललितप्रभा नाट्यमंडळ संचालित ललितप्रभा गांधर्व विद्यालयातर्फे श्री गजांतलक्ष्मी संस्थान आणि तारी सोसायटीच्या सहकार्याने वळवई व सावईवेरे पंचक्रोशी मर्यादित शास्त्रीय संगीत तसेच वादन स्पर्धा घेण्यात आली.

शास्त्रीय गायन साथिया पांडू पालकर, तेजल आनंद शिरोडकर- प्रथम, श्रेया शेखर वळवईकर व जिविका उमेश पालकर यांनी द्वितीय तर आर्यन प्रशांत नाईक व सोहम अरुण च्यारी यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.

हार्मोनियम वादन स्पर्धेत विनायक सुदेश कामत आणि साईप्रसाद विठ्ठल नाईक यांना प्रथम, सौमित्र सात्विक अभिषेकी व आदित्य दिगंबर कुमठेकर यांनी द्वितीय तर सुयश सुरेंद्र वळवईकर व साईश्रीपाद प्रसाद कामत यांनी तृतीय बक्षीस मिळवले. चौथे बक्षीस वेदांग भास्कर शिलकर व नंदेश प्रसाद कामत यांना देण्यात आले.

Ponda News
Mapusa News: म्हापशात युवा कोकणी साहित्य संमेलन

तबलावादन स्पर्धेत साईश्रीपाद प्रसाद कामत पहिला, विनायक सुदेश कामत दुसरा तर सुयश सुरेंद्र वळवईकर तिसरा आला. संगीत शिक्षक सुधीरकुमार सुर्लकर व बाळकृष्ण खांडेपारकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेचे परीक्षण संदेश खेडेकर व श्रीकृष्ण सतरकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com