Lakhere Bicholim: 100 वर्षांपूर्वीच्या गोठ्यावर टांगती तलवार! कोमुनिदाद जागेत असल्याचा दावा; डिचोली पालिकेची नोटीस जारी

Lakhere Bicholim: लाखेरे-डिचोली येथील एका धनगर कुटुंबाच्या गुरांच्या गोठ्यावर कारवाईची टांगती तलवार असून, हा गोठा मोडण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
Lakhere Bicholim
Lakhere BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: लाखेरे-डिचोली येथील एका धनगर कुटुंबाच्या गुरांच्या गोठ्यावर कारवाईची टांगती तलवार असून, हा गोठा मोडण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

एकतर हा गोठा हटवा, नाहीतर तो मोडण्यात येईल, अशी आदेशवजा नोटीस डिचोली पालिकेने संबंधित गोठ्याच्या मालकाला दिली आहे. गोठा काढण्यासाठी येत्या बुधवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बोर्डे कोमुनिदादने केलेल्या तक्रारीला अनुसरून पालिकेने संबंधित गोठ्याच्या मालकाला गेल्या २५ डिसेंबर २०२५ रोजी आदेशवजा नोटीस बजावली होती.

Lakhere Bicholim
Bicholim River: पाणी आहे की गटारगंगा? गोव्यातील 'ही' नदी सर्वात जास्त प्रदूषित; प्रदूषण मंडळाच्या अहवालाने वाढली चिंता

लाखेरे येथील श्री साईबाबा मंदिराच्या मागच्या बाजूने सर्व्हे नं. १०९/० या जमिनीत असलेला गुरांचा गोठा कोमुनिदाद जागेत असून, तो बेकायदेशीर आहे, असा दावा करून बोर्डे कोमुनिदादने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात डिचोली पालिकेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीला अनुसरून पालिकेने गोठ्याचे मालक कृष्णा ताटे यांना नोटीस बजावली आहे. यामुळे ताटे कुटुंब अस्वस्थ बनले अाहे.

Lakhere Bicholim
Bicholim Accident: सर्वण-डिचोलीत भीषण अपघात, कारनं दुचाकीला दिली धडक

ताटे कुटुंबावर संकट

कारवाईची टांगती तलवार असलेला लाखेरे येथील गुरांचा गोठा धनगर समाजातील कृष्णा ताटे यांचा आहे. शंभर वर्षांपूर्वीपासून हा गोठा असून, या गोठ्यात गाई, म्हशी मिळून पन्नासच्या आसपास गुरे आहेत. मात्र, आता हा गोठा मोडावा लागणार असल्याने ताटे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com