Lairai Jatra: लईराईच्या व्रतासाठी वाळपईत बाजार, धोंड तळावर साफसफाई; मंडप उभारण्याचेही काम सुरू

Lairai Jatra Shirgao: शिरगावच्या श्री देवी लईराईची जत्रा अगदी जवळ ठेपली असून लईराईचे धोंड पाच दिवस व्रतस्थ राहणार आहेत.
Lairai Jatra
Lairai JatraDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: शिरगावच्या श्री देवी लईराईची जत्रा अगदी जवळ ठेपली असून लईराईचे धोंड पाच दिवस व्रतस्थ राहणार आहेत. २१ रोजी ही जत्रा होणार आहे. व त्याआधी पाच दिवस धोंडतळावर व्रत केले जाणार आहे. हे व्रत अगदी कडक पाळले जाते. या व्रतासाठी पाचही दिवस दररोज लागणारे कपडे, सामान हे पूर्णपणे नवीनच घ्यावे लागते. हे सर्व सामान वाळपईच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.

वाळपई सुपर मार्केट, सत्तरी बाजार तसेच खासगी आस्थापनात हे सामान विक्रीसाठी दुकान मालकांनी ठेवले आहे. पांढरे पंचे, रंगीत पंचे, तांबे, कळशी, बादली, विविध व्रताचे कपडे, चप्पल, बकेट, खाद्य सामान, सोवळे इत्यादी लागणारे व्रताचे सामान विक्रीस आहे. सत्तरी तालुक्यात धोंड भक्तांना लईराईच्या उत्सवाचे वेध लागले आहेत.

Lairai Jatra
Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

या व्रतासाठी धोंड तळांवर जाऊन जागा स्वच्छता करणे, मंडप घालणे, शेणाने जमीन सारवणे, जेवण बनवण्यासाठी चुली तयार करणे इत्यादी कामे भक्तांनी श्रमदानाच्या माध्यमातून हाती घेतलेली आहेत. काही ठिकाणी कायम स्वरुपी मंडपाची व्यवस्था आहे. तिथेही साफसफाई करण्याची कामे सुरू आहेत. एकूणच यावर्षीही आत्ता पासूनच सत्तरीत धोंड भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Lairai Jatra
Goa Premier League: धेंपो क्लबची नाट्यमय मुसंडी; अंतिम फेरीत धडक, पणजी जिमखान्याला नमविले

केवळ होमखंडाच्या ठिकाणी लिंबू सरबत, चहा, कलिंगड विक्रीची सुरुवातीला नऊ व पुढे २५ अशी ३४ दुकाने असतील. दुसऱ्या दिवशी दुकानांची संख्या वाढवली जाईल.

धोंडांसाठी होमखंडाकडे जाण्यासाठी व तेथून परत येण्यासाठी दोन स्वतंत्र रांगा केल्या जातील. पोलिसांकडून त्याचे व्यवस्थापन केले जाईल. जत्रेसाठी १०० स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com