Bicholim News: डिचोली आरोग्य केंद्र ‘आजारी’; रुग्णांची परवड

Bicholim Primary Health Centre: आरोग्य केंद्राची इमारत बाहेरून जरी चकाचक वाटत असली तरी आत मात्र विविध समस्या आहेत
Bicholim Primary Health Centre: आरोग्य केंद्राची इमारत बाहेरून जरी चकाचक वाटत असली तरी आत मात्र विविध समस्या आहेत
Bicholim Health CenterDanik Gomantak
Published on
Updated on

डिचोलीतील सामाजिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव असून तपासणी किंवा उपचारासाठी या केंद्रात येणाऱ्या रुग्णांची अक्षरशः परवड होत आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील जनतेचे ‘आरोग्य’ अवलंबून आहे. परंतु या केंद्रात डॉक्टर्स, परिचारिकांसह आवश्यक सुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. एकंदरीत हे आरोग्य केंद्रच ‘आजारी’ असल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे.

या केंद्राला सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा प्राप्त झाला असला आणि आरोग्य केंद्राची इमारत बाहेरून जरी चकाचक वाटत असली तरी आत मात्र विविध समस्या आहेत. सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळूनही केंद्रात आवश्यक त्या सुविधा नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या आरोग्य केंद्राची पाहणी करून केंद्राचे आरोग्य सुधारावे, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.

या आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र गेल्या जवळपास सात-आठ महिन्यांपासून या केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. मये प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धी कांसार यांच्याकडे सध्या या डिचोली आरोग्य केंद्राचा ताबा आहे. या आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांचीही कमतरता आहे. परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागासह रुग्ण वॉर्डात सेवा करताना परिचारिकांना कसरत करावी लागत आहे.

Bicholim Primary Health Centre: आरोग्य केंद्राची इमारत बाहेरून जरी चकाचक वाटत असली तरी आत मात्र विविध समस्या आहेत
Bicholim Health Center : डिचोली आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव ; रुग्णांची गैरसोय

जनरेटर कुचकामी

या आरोग्य केंद्रात नियमितपणे डायलीसिसचे रुग्ण उपचारासाठी येतात. हा विभाग तिसऱ्या मजल्यावर आहे. त्यामुळे डायलीसीसच्या रुग्णांना लिफ्टचा आधार घ्यावा लागतो. या आरोग्य केंद्रात जनरटेरची सोय आहे. मात्र तो व्यवस्थित चालत नाही. वीजपुरवठा खंडित झाला, की लिफ्टसेवा बंद पडते. बऱ्याचदा रुग्ण लिफ्टमध्ये अडकून पडतात. क्ष-किरण यंत्रणा आहे, मात्र ती चोवीस तास उपलब्ध नाही. त्यामुळे आपत्कालीनवेळी ‘एक्स-रे’ काढण्यासाठी अन्यत्र जावे लागते. परिचारिकांची कमतरता असल्याने मलमपट्टी किंवा इंजेक्शन घेण्यासाठी तासन्‌तास ताटकळत राहावे लागते, असे प्रशांत लामगावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com