पुरेसे पुरावे न दिल्याने मंत्री माविन गुदिन्हो यांची सुटका, गोवा सरकारने हायकोर्टात अपील करावे; पाटकरांचे मुख्य सचिवांना पत्र

Amit Patkar: वीज सवलत घोटाळ्यात सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर झाला असून, यामुळे राज्यातील जनतेच्या विश्वासाला तडा गेला आहे, असे पाटकरांनी पत्रात म्हटले आहे.
Amit Patkar | Mauvin Godinho acquittal case
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज सवलत घोटाळ्यातून तत्कालिन वीज मंत्री आणि विद्यमान पंचायत मंत्री माविन यांची निर्दोष सुटका झाली. माविन यांच्या मुक्ततेबाबत काँग्रेस नेते अमित पाटकारांनी आक्षेप नोंदवला आहे. राज्य सरकारने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पाटकरांनी याबाबत आता मुख्य सचिवांना पत्र लिहून संबधित प्रशासनाला याबाबत सूचना करण्याची मागणी केलीय.

माविन यांच्या विरोधात न्यायालयात योग्य आणि पुरेसे पुरावे सादर न केल्याने त्यांची सुटका झाल्याचा दावा पाटकरांनी केला आहे. वीज सवलत घोटाळ्यात सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर झाला असून, यामुळे राज्यातील जनतेच्या विश्वासाला तडा गेला आहे.

अशाप्रकारच्या निवाड्याला वरच्या न्यायालयात आव्हान दिले नाही तर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो आणि नागरिकांचा कायद्याच्या राज्यावरुन विश्वास उडू शकतो, असे अमित पाटकरांनी मुख्य सचिवांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Amit Patkar | Mauvin Godinho acquittal case
Court Verdict: 4.52 कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणी माविन गुदिन्हो दोषमुक्‍त, पर्रीकरांनी केले होते आरोप; तब्‍बल 27 वर्षानंतर निकाल

त्यामुळे गोवा सरकारने उच्च न्यायालयात याबाबत तत्काळ अपील करावे, अशी मागणी पाटकरांनी केली आहे. उच्च न्यायालयात जाताना योग्य कायदेशीर नियोजन, आवश्यक कागदपत्रं, पुरावे यांची मदत घ्यावी, असेही पाटकरांनी सचिवांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Amit Patkar | Mauvin Godinho acquittal case
Panaji Ashtami fair earnings: पणजी पालिका मालामाल! अष्टमीच्या फेरीतून विक्रमी 1.15 कोटींची कमाई, विनापरवाना 5 अतिरिक्त दिवस सुरु होती फेरी

अमित पाटकरांनी काय मागण्या केल्या आहेत?

१)   गुदिन्हो यांच्या निर्दोष मुक्ततेबाबत उच्च न्यायालयात अपील करावी

२)   तपासात आणि कोर्टात बाजू मांडण्यात आलेली निष्क्रियेतेची पडताळणी करावी आणि असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी.

३)   प्रकरणाचे गांभीर्य समजून काम करणाऱ्या कायेदतज्ज्ञांची विशेष टीम तयार करावी.

अशा सूचना संबधित प्रशासनाला कराव्यात असे अमित पाटकरांनी मुख्य सचिवांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com