
कामगार व रोजगार विभागाकडे परप्रांतीय कामगारांच्या संख्येची पंचायतनिहाय नोंद नाही. या विभागाकडे गोव्यातील परप्रांतीय कामगारांच्या विरुद्ध एकही तक्रार किंवा खटलेही नाहीत, असे कामगार आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.
गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने अलीकडे राज्यात स्थलांतरितांच्या ओघाबद्दल समस्या भेडसावत आहे. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. परप्रांतीय लोकांकडे रोजगार जात आहे आणि अलीकडच्या काळात स्थलांतरित मोठ्या संख्येने गोव्यात स्थायिक होत आहेत.
या मुद्यावर वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी कामगार आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांना गोव्यात राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या संख्येबद्दल विचारले होते. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मोन्सेरात यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले की, विभाग परप्रांतीय कामगारांबद्दल पंचायतनिहाय तपशील ठेवत नाही. याशिवाय विभागामध्ये परप्रांतीयांवर कोणतीही तक्रार किंवा गुन्हे दाखल नाहीत.
नोंदणीची तरतूद नाही
मोन्सेरात यांनी पुढे नमूद केले की आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम, १९७९च्या तरतुदीनुसार, कामगार आणि रोजगार विभाग मजुरांना कामावर ठेवणाऱ्या कंत्राटदारांना नोंदणी प्रमाणपत्रे आणि परवाना जारी करतो. मात्र, या कायद्यांतर्गत या विभागांमार्फत परप्रांतीय कामगारांची नोंदणी करण्याची तरतूद नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.