Panaji News : रात्रंदिवस मजूर राबले म्‍हणून; चेंबर (मॅनहोल) मोहीम फत्ते

Panaji News : ताळगाव, आल्तिनो परिसरातील पंकज शुक्ला या साहाय्यक कंत्राटदाराने जवळपास ४० चेंबर्स बांधली आहेत.
Panaji
Panaji Dainik Gomantak

सचिन कोरडे

पणजी शहरातील संपूर्ण ड्रेनेज सिस्टिम बदलण्यात आली आहे. पोर्तुगीजकालीन चेंबर्सला (मॅनहोल) कोणताही हात न लावता नव्याने चेंबर्सची बांधणी करण्यात आली. हे काम आता जवळपास संपले आहे.

वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या कंत्राटदारांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. ताळगाव, आल्तिनो परिसरातील पंकज शुक्ला या साहाय्यक कंत्राटदाराने जवळपास ४० चेंबर्स बांधली आहेत. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. त्यांनी याबाबत काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिली, ती अशी...

यंत्र आणि मजूर...

एक चेंबर (मॅनहोल) उभारणीसाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागतो.

चेंबर्ससाठी विशिष्ट यंत्राद्वारे जागा ठरविली जाते. दोन चेंबर्समधील अंतर हे कमीत कमी ३० ते ३५ मीटर एवढे असते.

चेंबर्ससाठी यांत्रिकी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने खोदकाम केले जाते. यासाठी खास पद्धतीचा वापर केला जातो.

एका चेंबरवर किमान १० मजूर काम करतात.

जमिनीच्या उथळ भागावरून चेंबर्सची खोली ठरविली जाते. कमीत कमी ६ फूट ते जास्तीत जास्त २० फूट खोल असे हे चेंबर असते.

गोव्यात केबलिंगचा त्रास

चेंबरचे काम करणाऱ्या एका मजुराने सांगितले की, आम्हाला गोव्यात चेंबर्स खोदताना खूप त्रास झाला. कारण, येथे लाल रंगाची माती असून त्यात दगडांचे प्रमाण अधिक आहे.

तसेच खोदकाम करताना आम्हाला वीजवाहिन्या तसेच इतर केबल्स, पाईप्स आढळून आल्या, त्या बाजूला सारून काम करणे अवघड होते. तसेच खोदकाम करताना झिरपून आलेले पाणी बाजूला काढण्‍यात वेळ जात असे.

Panaji
Jetty In Goa : शापोरा जेटीशी निगडीत मच्छिमारांचे दरवर्षी लाखो रुपयांचे होतेय नुकसान ; बलभीम मालवणकर यांचा दावा

सहा महिन्यांपासून गोव्यात वास्तव्य

स्मार्ट सिटीच्या मलनिस्सारण वाहिनीचे काम करणारे बरेच मजूर हे बिहार, दिल्ली आणि कोलकाता येथून आले आहेत. या मजुरांचे सहकंत्राटदार पंकज शुक्ला यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा मजुरांची जबाबदारी आहे. या सर्व मजुरांची निवासाची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मजुरांना ने- आण करण्यासाठी गाडीसुद्धा आहे. मलनिस्सारणाचे काम खूप कष्टाचे आहे. मात्र, ही कामे करणाऱ्यांना त्याची सवय झाली आहे. या लोकांचे जीवनच कष्टमय आहे.

दमट वातावरणामुळे बेहाल..

आग्रा येथील एका मजुराने सांगितले की, आमच्याकडे उष्ण तापमान असते; मात्र गोव्यातील दमट वातावरणाचा आम्हाला खूप त्रास होत आहे. दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहत असतात. संपूर्ण कपडे घामाने ओले चिंब होतात.

जीव पाणी पाणी करतो. त्यातच डोळ्यांपुढे कामाचा ढीग असतो. ते सोडून कुठेही निवांतपणे बसता येत नाही. गोव्यात आम्हाला दमट वातावरणाचा बराच त्रास झाला. बऱ्याचदा आरोग्याची समस्या जाणवते; मात्र आम्ही त्यावरही मात करून कामे करीत आहोत. हात, पाय आणि संपूर्ण शरीरावरही लाल रंगाचे डाग पडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com