Panaji News : लोकसभा निकालापूर्वी भाजप नेत्यांचे देवदर्शन; मुख्यमंत्र्यांची तीर्थयात्रा

Panaji News : भाजपचे राष्ट्रीय नेते देवदेवतांच्या दर्शनाला गेले आहेत, म्हटल्यावर गोव्यातील नेत्यांनीही हिमालयातील देवतांच्या पूजा करणे पसंत केले.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून १ जून रोजी निवडणुकीचे शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

केंद्रातील भाजपच्या महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांनीही देवाचा धावा केला आहे, त्यात मग गोव्यातील नेते कसे मागे राहतील? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह इतर नेत्यांनीही देवाचा धावा सुरू केला आहे.

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जाऊन ध्यानस्थ होण्याचा मार्ग स्वीकारला आहे, तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबीयांसमवेत बालाजीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेशाकडे प्रस्थान केले आहे. दोन्ही नेते गेले म्हटल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कसे मागे राहतील? त्यांनीही बिलासपूर येथील कुलदेवीच्या मंदिरात जाऊन पूजा केली.

Panaji
Goa Statehood Day: सावंत सरकारचा धिक्कार... सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही; अमरनाथ पणजीकर बरसले

उत्तराखंडमध्ये गंगापूजा

भाजपचे राष्ट्रीय नेते देवदेवतांच्या दर्शनाला गेले आहेत, म्हटल्यावर गोव्यातील नेत्यांनीही हिमालयातील देवतांच्या पूजा करणे पसंत केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे, मंत्री फळदेसाई आणि व इतरांनी माता कुंजापुरी देवीची पूजा केली.

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील गंगेच्या काठावर जाऊन सायंकाळी आरती केली. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचाही सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com