Pernem: आमदार प्रवीण आर्लेकरांना मंत्रिपद द्या; पेडणेतील एका पंचायतीने चक्क मंजूर केला ठराव

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकरांना मंत्रिपद मिळायला हवे असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
Pravin Arlekar
Pravin ArlekarDainik Gomantak 
Published on
Updated on

MLA Prabin Arlekar: गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील पेडणे तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने अजब ठराव मंजूर केला आहे. तालुक्याच्या आमदाराला मंत्रिपद द्यावे यासाठी हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

पेडणे तालुक्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागयचे असतील, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकरांना मंत्रिपद मिळायला हवे असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

पेडणे तालुक्यातील कोरगाव पंचायतीने हा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. पेडणे तालुक्यात अनेक प्रकल्प येतात. पण अनेक प्रकल्प मार्गी लागत नाहीत. स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना मंत्रिपद दिल्यास सर्वच प्रकल्प मार्गी लागू शकतात. असे मत अनेकांनी ग्रामसभेत व्यक्त केले.

पेडणे तालुक्यातील आमदाराला नेहमीच मंत्रिपद मिळत असते, यापूर्वी बाबू आजगावकर, राजेंद्र आर्लेकर यांना देखील मंत्रिपद उपभोगली आहेत. दरम्यान, या मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रवीण आर्लेकर यांना भाजपने मंत्रिपदापासून अद्याप लांबच ठेवले आहे. त्यात कोरगाव पंचायतीच्या या ठरावामुळे आर्लेकरांच्या मंत्रिपदाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Pravin Arlekar
Goa Beaches: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या मदतीला नेदरलँडचे 'सँड मोटर तंत्रज्ञान', कसा होणार फायदा?

आमदार प्रवीण आर्लेकर यांचा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठीचा (एससी) एकमेव राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराला मंत्रिपद दिले जाते. यापूर्वी बाबू आजगावकर आणि सध्या बिहारचे राज्यपाल असणारे राजेंद्र आर्लेकर यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात मंत्रिपद देण्यात आले आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही अनेकवेळा मंत्रिपद मिळावे अशी इच्छा बोलून दाखवली आहे. आता कोरगाव पंचायतीचा ठराव सरकारवर दबाब निर्माण करण्यास यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com