Goa News : कोपार्डे सत्तरीतील ईसम बेपत्ता; पत्नीसह ट्रकचालकाची पोलिसांत तक्रार

गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता; वाळपई पोलिसांत तक्रार नोंद
Rupesh Pilgaonkar missing person
Rupesh Pilgaonkar missing personDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News : कोपार्डे सत्तरी येथील विवाहीत इसम गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता आहे. याबाबतची तक्रार त्याच्या पत्नीने वाळपई पोलिस स्थानकात नोंद केली आहे. रुपेश शिवराम पिळगावकर (४३) असे बेपत्ता इसमाचे नाव आहे. याबाबत वाळपई पोलिसांनी रुपेश पिळगावकर बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली आहे.

सदर तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे कि, १८ डिसेंबर रोजी सकाळी १०.४५ च्या दरम्यान त्याचे पती रुपेश यांनी त्यांना त्या काम करत असलेल्या वाळपईतील आस्थापनात येऊन सांगितले की ते 10 दिवस नसणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याबाबत चौकशी केली असता गावातील एका युवकाने सांगितले की तुम्ही रुपेशची काही काळजी करु नका त्याला आपण नाणूस येथील एका व्यक्ती सोबत ट्रकवर पाठविले आहे व तो दहा दिवसांने परत येईल. रुपेशचा फोन न आल्याने तीने त्याची परत चौकशी केली. तेव्हा त्या गावातील युवकाने सांगितलेल्या पहिल्या माणसासोबत रुपेश गेला नाही तर तो एका दुसऱ्याच माणसासोबत गेल्याचे समजले.

Rupesh Pilgaonkar missing person
Mahadayi Water Disputes: कर्नाटकचा अहवाल पंतप्रधानांनी न फेटाळल्यास मुख्यमंत्री राजीनामा देतील ?

दरम्यान, २४ डिसेंबर रोजी त्या युवकाने दुपारी ३.४५ च्या दरम्यान रुपेशच्या पत्नीला फोन करुन सांगितले की, रुपेश गाडीवरुन उतरला व तो मिळत नाही. तू त्याचा फोटो पाठव जेणे करुन त्याला शोधता येईल तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार करु नको असे त्यांनी सांगितले. अजूनपर्यंत रुपेशचा कोणताही फोन न आल्याने तो ज्या माणसासोबत गेला होता त्या माणसावर रुपेशच्या पत्नीने संशय व्यक्त केला आहे व त्या माणसाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी रुपेशची पत्नी रश्मी पिळगावकर यांनी केली आहे.

रश्मी यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांना दोन मुली असुन मोठी मुलगी १७ वर्षाची आहे आणि तिचे काही महिन्यांपुर्वी हार्ट आॅपरेशन झाले होते तर लहान मुलगी अडीच वर्षाची आहे. दरम्यान पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रुपेश पिळगावकर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली आहे. तसेच त्या ट्रक चालकाने रुपेश हा आंध्रप्रदेशहुन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com