डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Ravi Naik: सर्व गोवा बंदचे आवाहन कोंकणी प्रजेचो आवाज या संघटनेने दिले होते. आणि त्‍यामुळे ऐन ख्रिसमसच्‍या मोसमात मडगावची बाजारपेठ सतत सहा दिवस बंद होती.
Ravi Naik Political Career
Ravi Naik Political CareerDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: डिसेंबर १९८६, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले होते. चर्चिल आलेमाव आणि कंपनीची त्‍यावेळी प्रचंड दहशत सासश्‍‍टीत पसरली होती. अशाच वातावरणात एक दिवस पोलिसांकडून झालेल्‍या कारवाईत फ्‍लोरियान वाझ यांचा गोळीबारात मृत्‍यू झाला आणि त्‍यामुळे सासष्टी एकदम पेटून उठली.

सर्व गोवा बंदचे आवाहन कोंकणी प्रजेचो आवाज या संघटनेने दिले होते. आणि त्‍यामुळे ऐन ख्रिसमसच्‍या मोसमात मडगावची बाजारपेठ सतत सहा दिवस बंद होती. सासष्टीत त्‍यावेळी ठिकठिकाणी जिलेटिन स्‍फोट घडवून विध्‍वंस केला जात होता.

त्‍यामुळे रस्‍त्‍यावर पाय ठेवण्‍यास सुद्धा लोक घाबरत होते. अशा या स्‍फोटक वातावरणात मडगावच्‍या व्‍यापाऱ्यांच्‍या साहाय्याला जर कुणी निडरपणे धावून आले असतील तर ते रवी नाईक हेच आणि ते सुद्धा रात्री ११ वाजण्‍याच्‍या सुमारास.

या घटनेचे प्रत्‍यक्ष साक्षीदार असलेले त्‍यावेळचे मगोचे कार्यकर्ते आणि सध्‍या गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस असलेले मोहनदास लोलयेकर हे. गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या साश्‍‍टीकार या कार्यक्रमात जवळपास ४० वर्षांपूर्वी घडलेली घटना आपल्‍या वर्णनाने प्रत्‍यक्ष जागी केली.

Ravi Naik Political Career
Who After Ravi Naik: रवींनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

लोलयेकर यांची मुलाखत गोमन्‍तकचे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी घेतली असून ही मुलाखत गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या यू-ट्यूब, इन्‍स्‍टाग्राम व फेसबुकवर उपलब्‍ध आहे. लोलयेकर व नाईक यांनी रवी नाईक यांची भेट घेतली. त्‍याच रात्री रवी नाईक एका खासगी गाडीने मडगावात आले.

Ravi Naik Political Career
Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवि नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

गाडीत लोलयेकर आणि नाईक हेही होते. त्‍या दिवशी रात्री ते ११ च्‍या सुमारास मडगावात पोचल्‍यावर रवी नाईक यांनी सर्वांत प्रथम कोंब वाड्यावर भेट देऊन तेथे दहशतीखाली वावरणाऱ्या काही कुटुंबांना सर्वप्रथम दिलासा दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते मडगावात दाखल झाले. मडगाव बाजारात निर्भीडपणे फिरले आणि त्‍यामुळे मडगावच्‍याही व्‍यापाऱ्यांना धीर आला, असे लोलयकर यांनी सागितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com