ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक आणि कोंकणी चळवळीचे कार्यकर्ते भारत नायक यांचे निधन

Bharat Nayak Death : त्यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. नायक यांच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू होते.
Bharat Nayak Death
Bharat Nayak DeathDainik Gomantak
Published on
Updated on

कोंकणी साहित्याला आजवर अनेक उत्कृष्ठ साहित्यकार लाभले आहेत. आज त्या साहित्यकारांपैकी एक ज्येष्ठ साहित्यकार स्वर्गवासी झाले आहेत. ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक, अभिनेते आणि कोंकणी चळवळीचे कार्यकर्ते भारत नायक यांचे आज निधन झाले आहे.

काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचे म्हटले जात आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. नायक यांच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू होते. तिथून उपचार घेऊन सध्या ते एका आश्रमात आयुर्वेदिक उपचार घेत होते.

Bharat Nayak Death
...म्‍हणून आंदोलन स्‍थगित: कृष्णा साळकर

भारत नायक हे एक उत्कृष्ट नट, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि कवी होते. त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक अशा 100 नाटकांमध्ये गावोगावी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांचा 'कोकणी प्रजिचो आवाज' या चळवळीत सक्रिय सहभाग होता.

गोवा कला अकादमी तर्फे नाट्य क्षेत्रांमध्ये त्यांना 25 वर्षांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लहान नाटकांचा देखील समावेश आहे.

भारतीय भाषा संस्थान मैसूर या संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या कोंकणी बालगीतांच्या पुस्तकांमध्ये त्यांचा गीतकार म्हणून खूप मोलाचा वाटा होता. शिवाय भारत नायक यांनी 15 व्या अखिल भारतीय कोकणी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आज त्यांच्या जाण्याने कोकणी साहित्य विश्वामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Rainfall Deficit 2026
Goa Ganesh Chaturthi Celebration 2026
Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com